वॉशिंग्टन : पाकिस्तानातील दहशतवादी लक्ष काबूलवरून इस्लामाबादकडे वळत असून पाकिस्तानी नेतृत्वाने याकडे लक्ष द्यावे असा इशारा अमेरिकेच्या परराष्ट्र सचिव रेक्स टिलरसन यांनी केलीय.


आक्रमक टिलरसन


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाकिस्तानला कडक इशारा देताना टिलरसन यांनी म्हटलंय कि दहशतवाद्यांना जर पाकिस्तानात असच मोकळं रान मिळालं तर भविष्यात त्यांचं लक्ष काबूलवरून इस्लामाबादकडे लक्ष वळवू शकतं. पाकिस्तानच्या भूमीवरून दहशतवाद्यांना मिळत असलेल्या आश्रयाबद्दल तसच दहशतवाद्यांवर कडक कारवाई करण्यासंदर्भात डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेले सज्जड निरोप टिलरसन यांनी याआधीही पोहोचवले आहेत. 


पाकिस्तान नावाचा स्वर्ग


पाकिस्तानने मोठ्या संख्येने दहशतवादी संघटनांना आश्रय दिला आहे. दिवसेंदिवस त्यांचा विस्तार वाढत चाललाय तसंच पाकिस्तानच्या अंतर्गत परिस्थितीवर त्यांचा प्रभावही वाढत चाललाय. जगभरातल्या दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान हा स्वर्गच झालाय.


अमेरिका गेली उडत


याच पद्धतीने दहशतवाद्यांची ताकद वाढत राहिली तर एक दिवस ते पाकिस्तानवरच कब्जा करण्याचा प्रयत्न करतील आणि त्यातून सगळ्या जगासमोरच एक मोठं संकट निर्माण होईल, अशी भीती वर्तवली जातेय. पण पाकिस्तान मात्र या गोष्टींकडे लक्ष देण्यास तयार नाही. उलट पाकिस्तानला अमेरिकेपलीकडे जाऊन चीन आणि रशियाशी मैत्री घट्ट करण्याची गरज असल्याचं वक्तव्य पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री ख्वाजा असीफ यांनी केलंय.