नवी दिल्ली : ना'पाक' आणि कंगाल पाकिस्तान भारताच्या विरोधात कारवाया करण्याची कोणतीच संधी नसते. भारताने इतर देशांसोबत केलेला करार देखील पाकिस्तानला रुचत नाही आहे. पाकिस्तान भारतासोबतचा करार रद्द करण्यासाठी इतर देशांकडे मागणी करत आहे. काही दिवसांपूर्वीच रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन भारताच्या दौऱ्यावर आले होते. ज्यामध्ये रशियासोबत अनेक महत्त्वाचे करार झाले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाकिस्तान भारत आणि रशिया यांच्यातील S-400 करारामुळे चांगलाच घाबरलेला दिसतोय. पाकिस्तानने मास्कोकडे हा करार रद्द करण्याची मागणी केली आहे. भारताला शस्त्र विकणाऱ्या देशांना याची खात्री हवी की यामुळे क्षेत्रीय शक्ती संतुलनाला नुकसान पोहोचणार नाही असं पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते मुहम्मद फैसल यांनी म्हटलं आहे. 


भारताने अमेरिकेच्या बंदीनंतरही रशियासोबत हा करार केला. दिल्लीतील हैदराबाद हाउसमध्ये पंतप्रधान मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या उपस्थितीत हा करार झाला. याशिवाय दोन्ही देशांमध्ये आणखी 8 मोठे करार झाले. पीएम मोदी आणि पुतिन यांनी या कराराची घोषणा केली. पंतप्रधान मोदींनी यावेळी भारतासोबत संबंध मजबूत केल्यामुळे त्यांचं कौतूक देखील केलं.