इम्रान खान यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा
Imran Khan Relief: 13 डिसेंबर रोजी इम्रान आणि माजी परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरेशी यांना या प्रकरणात दुसऱ्यांदा दोषी ठरवले होते.
Imran Khan Relief: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान आणि माजी परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने या दोघांना जामीन मंजूर केला. न्यायालयाने दोघांना प्रत्येकी 10 लाख रुपयांचे जामीनपत्र जमा करण्याचे निर्देश दिले. द डॉनने यासंदर्भात वृत्त दिले आहे. न्यायमूर्ती सरदार तारिक मसूद यांच्या अध्यक्षतेखालील आणि न्यायमूर्ती अतहर मिनाल्ला आणि सय्यद मन्सूर अली शाह यांच्या तीन सदस्यीय खंडपीठाने हा आदेश जारी केला आहे.
सिफर प्रकरण राजकीय दस्तावेजाशी संबंधित आहे. फेडरल प्रोब एजन्सीच्या आरोपपत्रात त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. इम्रान यांना पंतप्रधानपदावरून हटवण्याची अमेरिकेकडून धमकी देण्यात आली होती, असे यात म्हटले आहे.
13 डिसेंबर रोजी इम्रान आणि माजी परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरेशी यांना या प्रकरणात दुसऱ्यांदा दोषी ठरवल्यानंतर, विशेष न्यायालयाने गेल्या आठवड्यात अदियाला जिल्हा कारागृहात नव्याने खटला सुरू केला.
माजी पंतप्रधान आणि त्यांचे सहकारी कुरेशी यांना या प्रकरणात 23 ऑक्टोबर रोजी प्रथम दोषी ठरवण्यात आले होते. आपण निर्दोष असल्याची बाजू या दोघांनी मांडली होती. अदियाला तुरुंगात खटला सुरू होता आणि चार साक्षीदारांनी आधीच त्यांचे जबाब नोंदवले होत. दरम्यान, IHC ने तुरुंगातील खटल्यासाठी सरकारची अधिसूचना 'चुकीची' असल्याचे म्हटले आणि संपूर्ण कार्यवाही रद्द केली.
IHC ने इम्रानच्या खटल्याला पाठिंबा दिला होता, त्याविरुद्धची त्याची याचिका निकाली काढली होती. पण विशेष न्यायालयाच्या न्यायाधीशांना 'निष्पक्ष खटला' करण्याचे निर्देशही दिले होते.