भारतीय कुलभूषणसाठी होणार पाकिस्तानच्या `आर्मी ऍक्ट`मध्ये बदल
यानंतर कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानच्या हायकोर्टात दाद मागण्याचा अधिकार मिळणार
नवी दिल्ली : हेरगिरीच्या आरोपाखाली पाकिस्तानने अवैधरित्या अटक करून फाशी सुनावलेल्या कुलभूषण जाधव यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. पाकिस्तान सरकारने जाधवांना उच्च न्यायालयात अपिल करता यावं यासाठी आता आर्मी कायद्यात बदल करण्याचा निर्णय घेतलाय. या सुधारणेचा मसुदाही तयार करण्यात आलाय. पाकिस्तान सरकारमधल्या सूत्रांकडून झी मीडियाला ही माहिती समजली आहे.
गुप्तहेरीच्या आरोपाखाली पाकिस्तानच्या कैदेत असलेल्या भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांच्यासाठी पाकिस्तानच्या 'आर्मी ऍक्ट' अर्थात सैन्यदल कायद्यात बदल केला जाणार आहे. यानंतर, कुलभूषण जाधव यांना आपल्याविरुद्ध देण्यात आलेल्या निर्णयाला पाकिस्तानच्या हायकोर्टात दाद मागण्याचा अधिकार मिळणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, पाकिस्तान सरकारनं सैन्यदल कायद्यात बदल करण्यासाठी एक ड्राफ्टही तयार करण्यात आलाय.
उल्लेखनीय म्हणजे, आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे (ICJ) अध्यक्ष न्यायाधीश अब्दुलकावी ए. युसूफ यांनी गेल्या ऑक्टोबर महिन्यात संयुक्त राष्ट्र महासभेत, पाकिस्ताननं भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांना राजनैतिक मदतीची परवनगी नाकारून व्हिएन्ना कराराचं उल्लंघन केलंय.