नवी दिल्ली : हेरगिरीच्या आरोपात पाकिस्तानच्या जेलमध्ये कैद असलेले भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांची पत्नी आणि आई २५ डिसेंबरला पाकिस्तानात त्यांना भेटण्यासाठी गेल्या होत्या.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने जगाला दिखाव्यासाठी त्यांची भेट घडवून आणली. काचेच्या कॅबिनमध्ये बसवून ही भेट केली गेली. पण यामागेचं पाकिस्तानचं कारस्थान समोर आलं आहे. पाकिस्तानने एक गोष्ट लपवण्यासाठी त्यांची भेट काचेच्या भिंतीमधून केली.


जाधव यांच्या कानाजवळ आणि डोक्यावर अनेक जखमा दिसून आल्या. यावरुन हे लक्षात आलं असेल की त्यांच्यावर किती अत्याचार पाकिस्तानने केले आहेत. 


भेटीदरम्यान जाधव हे एका निळ्या रंगाच्या कोटमध्ये दिसत आहेत. जाधव यांच्या मानेवर देखील काही जखमा दिसत आहेत. अशी शक्यता आहे की त्यांना तेथे मारहाण झाली असावी. या जखमा दिसू नयेत म्हणून त्यांना काचेच्या कॅबिनमध्ये बसवण्यात आलं. 



मेडिकल रिपोर्टनुसार जाधव हे व्यवस्थित असल्याचं म्हटलं गेलं आहे. पण या मेडिकल रिपोर्टमध्ये अनेक चुका असल्याचं समोर आलं आहे. मेडिकल रिपोर्ट हा एका प्लास्टिक सर्जनकडून करण्यात आला आहे.