Pakistan Inflation : पाकिस्तान आणखी कंगाल, महागाईने 48 वर्षांचा रेकॉर्ड तोडला
Pakistan Inflation Record : पाकिस्तानमध्ये महागाईचा आगडोंब उसळला आहे. डॉलरच्या तुलनेत पाकिस्तानी रुपयाची घसरण सुरु असून एका डॉलरची किंमत 260 पाकिस्तानी रुपये झाली आहे. पाकिस्तानमध्ये महागाई दर सर्वात जास्त म्हणजे 27.6 टक्क्यांवर पोहोचला आहे.
Pakistan Inflation at Record Level : महागाईनं पाकिस्तान (Pakistan) आणखी भिकेकंगाल झाला आहे. पाकिस्तानात महागाईने 48 वर्षांचा रेकॉर्ड तोडलाय. (Inflation in Pakistan) 1975 नंतर पाकिस्तानमध्ये महागाई दर सर्वात जास्त म्हणजे 27.6 टक्क्यांवर पोहोचला आहे. पाकिस्तानी जनता महागाईने होरपळत असून जीवनावश्यक वस्तूंसह इंधनाचे दरही भडकले आहेत. पीठ, डाळ, तांदूळ, दूध, गॅसचे दर गगनाला भिडलेत.
पगारवाढीसाठी कर्मचारी रस्त्यावर उतरल्याने गोंधळ, 10 वर्षातील सर्वात मोठा संप
गव्हाचं पीठ दीडशे रुपये किलोने (Pakistan Wheat Crisis) मिळत आहे. तर पेट्रोलचा दर अडीचशे रुपयांवर पोहोचलाय. पाकिस्तानकडे पैसेच नसल्यानं फळ आणि भाजीपाल्याने भरलेले जवळपास 6 हजार कंटेनर कराची बंदरात उभे आहेत. परिस्थिती एवढी बिकट आहे की बंदरात नवीन कंटेनर उभे राहण्यासाठी जागाच उरलेली नाही. फक्त महिनाभर पुरेल एवढाच खाण्याच्या तेलाचा साठा शिल्लक राहिला आहे.
तर दुसरीकडे डॉलरच्या तुलनेत पाकिस्तानी रुपयाची घसरण सुरु असून एका डॉलरची किंमत 260 पाकिस्तानी रुपये झाली आहे. दरम्यान, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संघटनेने कर्जपुरवठ्यासाठी कडक अटी घातल्या आहेत. वीज आणि इंधन 60 टक्क्यांपर्यंत महाग करण्याच्या अटीमुळे महागाई आणखीनच भडकणार आहे. कठीण काळात चीननेही साथ सोडलीय. नवीन कर्ज देणं तर दूरच राहिलं मात्र चीनने पाकिस्तानकडून जुन्या कर्जाचे हफ्ते परतफेड करण्याची मागणी केलीय.
ब्रिटनमध्येही 40 वर्षातील महागाईचा उच्चांक
ब्रिटनच्या रस्त्यावर गेल्या 10 वर्षांतला अभूतपूर्व संप पाहायला मिळाला. (UK inflation back at 40-year high as food prices soar) पगारवाढीसाठी 5 लाखांहून अधिक लोक लंडनच्या रस्त्यावर उतरले होते. शिक्षक, विद्यापीठाचे प्राध्यापक, रेल्वे बस चालक आणि सरकारी कर्मचाऱ्यांनी सुनक सरकारविरोधात निदर्शनं केली आहेत. (Rising food and energy costs drove UK inflation) पगार वाढवून महागाई नियंत्रणात आणण्याची मागणी संपकऱ्यांनी केलीय. संपावर गेलेल्यांमध्ये 3 लाख शिक्षकांचा समावेश होता. त्याचा मोठ्या प्रमाणात फटका दैनंदिन व्यवहारांवर बसला आहे.
23 हजार शाळा यामुळे प्रभावित झाल्या तर जवळपास 85 टक्के शाळा बंद राहिल्या. रेल्वे चालक संपावर गेल्यानं बहुतांश रेल्वे बंद होत्या.. ब्रिटनमध्ये महागाई आधीच गगनाला भिडली आहे. पगार वाढवले तर महागाई आणखी वाढेल असं कारण पंतप्रधान ऋषी सूनक यांनी दिलंय. तेव्हा सूनक यांची तुलना माजी पंतप्रधान मार्गारेट थॅचर यांच्यासोबत केली जात आहे.
ब्रिटनमध्ये महागाईनं कंबरडं मोडलं
- मागच्या 40 वर्षातील महागाईचा उच्चांक, दर 9.3 टक्क्यांवर
- वीज बिल, गॅस, इंधनाच्या किंमतीत विक्रमी वाढ
- भाड्याच्या घरासाठी महिना अडीच लाख भाडं
- खाद्यपदार्थांच्या किंमतीत 13.8% वाढ
- फळं आणि भाजीपाल्याचे दर झपाट्याने वाढले
- 10 तास काम करुनही पास्तावरच दिवस काढण्याची वेळ