Strike : पगारवाढीसाठी कर्मचारी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरल्याने गोंधळ, 10 वर्षातील सर्वात मोठा संप

UK News: पगारवाढीसाठी कर्मचारी रस्त्यावर उतरल्याने मोठा गोंधळ उडाला आहे. 10 वर्षातील सर्वातील हा सर्वात मोठा संप आहे.

Updated: Feb 2, 2023, 03:38 PM IST
Strike : पगारवाढीसाठी कर्मचारी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरल्याने गोंधळ, 10 वर्षातील सर्वात मोठा संप title=
UK Strike

UK Strike : पगारवाढीसाठी अनेक जण रस्त्यावर उतरले आहेत. शिक्षकांव्यतिरिक्त,  रेल्वे आणि बस चालक आणि इतर सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचारी देखील संपावर आहेत. देशातील 124 सरकारी विभागातील सुमारे एक लाख कर्मचारीही संपात सहभागी आहेत. जवळजवळ दशकभरात प्रथमच ब्रिटनमध्ये मोठा सामूहिक संप झाला आहे. (UK Strike News : The history of strikes in the UK) 

बुधवारी शिक्षक, विद्यापीठाचे प्राध्यापक, रेल्वे आणि बस चालक आणि सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचारी पगारवाढीच्या मागणीसाठी संपावर गेले. जवळपास दशकभरात देशात पहिल्यांदाच अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या अधिकृत प्रवक्त्याने कबूल केले की सामूहिक संपामुळे जनतेला मोठा त्रास सहन करावा लागणार आहे.

शिक्षक संपामुळे 23,000 शाळा प्रभावित

शिक्षकांनी इंग्लंड आणि वेल्समध्ये वर्गांवर बहिष्कार टाकला आहे, ज्यामुळे 23,000 शाळा प्रभावित झाल्या आहेत. या भागातील सुमारे 85 टक्के शाळा पूर्णपणे किंवा अंशतः बंद राहण्याचा अंदाज आहे. दरम्यान, युनियनने हा निर्णय घेतल्याने मी निराश आहे, असे शिक्षण मंत्री गिलियन कीगन यांनी सांगितले. हा शेवटचा उपाय नाही. आम्ही अजूनही चर्चा करत आहोत.

एक लाख कर्मचारीही संपात सहभागी 

सुमारे एक लाख कर्मचारीही संपात सहभागी असून शिक्षकांव्यतिरिक्त रेल्वे आणि बस चालक आणि सार्वजनिक क्षेत्रातील इतर कर्मचारीही संपावर आहेत. देशातील 124 सरकारी विभागातील सुमारे एक लाख कर्मचारीही संपात सहभागी आहेत. याशिवाय आरोग्य कर्मचारीही पुढील आठवड्यात संपावर जाण्याचा विचार करत आहेत, तेव्हा 6 फेब्रुवारीपासून परिचारिका आणि रुग्णवाहिका कर्मचारी पुन्हा संप करणार आहेत. त्यामुळे येथे गोंधळाची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.