मुंबई : कुलभूषण जाधव प्रकरणात अखेर पाकिस्तानला झुकावंच लागलं. ANI ने दिलेल्या रिपोर्टनुसार, पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय न्यायालयाने 2020 मध्ये काढलेल्या अध्यादेशाला मान्यता मिळाली आहे. (Pakistan Parliament adopts ICJ Ordinance, will grant Kulbhushan Jadhav right to appeal in high courts) यानंतर कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानने दिलेल्या शिक्षेविरोधात कोणत्याही उच्च न्यायालयात अपील करण्याची परवानगी मिळाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाकिस्तानच्या नॅशनल असेंबलीने गुरूवारी आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निर्णयासंबंधी पाकिस्तानीच्या कारागृहात बंद असलेले भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांना अपील करण्याचा अधिकार दिला आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयाने आपल्या निर्णयात असेंबलीला प्रभावी समीक्षा आणि पुर्नविचार करण्याचे आदेश दिले आहेत. 


कुलभूषण जाधव हे 2016 पासून पाकिस्तानच्या कारागृहात आहेत. पाकिस्तानच्या एजन्सीने कुलभूषण जाधव यांना इरान म्हणून पकडलं होतं. कुलभूषण जाधव हे माजी नेवी अधिकारी असल्याच्या मतावर भारत सरकार ठाम आहे. इरानमध्ये कुलभूषण जाधव एका बिझनेस डीलकरता गेले होते. तेथेच त्यांचं अपहरण करून पाकिस्तानच्या लष्कराकडे स्वाधीन करण्यात आलं. 


इस्लामाबादने कायमच जाधव यांच्यावर आरोप केलाय की, कुलभूषण जाधव हे भारताचे गुप्तहेर असून त्यांनी अनेक पाकिस्तानच्या दहशतवादी हल्ल्याची कारवाई केली. पाकिस्तानच्या एका न्यायालयाने मृत्यूदंड सुनावलं आहे. यानंतर भारत सरकारने International Court of Justice चा मार्ग स्विकारला. यानंतर भारताच्या बाजूने निर्णय झाला आणि पाकिस्तानच्या कारागृहाच असलेल्या कुलभूषण जाधव यांना काऊन्सलर मिळाला.