मुंबई : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (Pakistan PM Imran Khan) यांना कोरोनाची लागण झाली आहे. धक्कादायक म्हणजे, दोनच दिवसांपूर्वी त्यांनी कोरोना लसीचा (Corona vaccine) पहिला डोस घेतला होता. इम्रान खान सध्या होम आयसोलेशनमध्ये आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाकिस्तान पंतप्रधानांचे स्पेशल असिस्टेंट फैजल सुल्तान यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. इमरान खान यांनी चीनने तयार केलेली सिनोवॅक (Chinese corona vaccine sinovac) ही लस घेतली होती.



इम्रान खान कोरोना पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्यासोबत गेल्या काही दिवसांमध्ये बैठका घतेलेल्या किंवा संपर्कात आलेल्या सर्व मत्री आणि अधिकाऱ्यांचीही कोरोना चाचणी होणार आहे. इम्रान यांना कोरोनाची कोणतीही गंभीर लक्षणं नसल्याने ते होम क्वॉरंटाईन झाले आहेत. 


पाकिस्तानमध्येही कोरोनाची तिसरी लाट आल्याचं बोललं जात आहे. शुक्रवारी पाकिस्तानमध्ये ३ हजार ८७६ रुग्णांची नोंद झालेली. आतापर्यंत पाकिस्तानमध्ये ६२ लाखाहून जास्त लोकांना कोरोना झाला आहे. तर मृतांचा आकडा १३ हजारावर आहे.