नवी दिल्ली : अमेरिका दौऱ्यावर गेलेल्या पाकिस्तानचे पंतप्रधान शाहिद खाकन अब्बासी यांचा अमेरिकन अधिकाऱ्यांनी एअरपोर्टवर अपमान केल्याचं समोर येतंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जॉन एफ केनेडी एअरपोर्टवर नेहमीची सुरक्षा चौकशी दरम्यान एका देशाच्या पंतप्रधानांची - अब्बासी यांची एखाद्या सामान्य नागरिकाप्रमाणे कपडे उतरवून चौकशी करण्यात आली. 


एखाद्या देशाच्या पंतप्रधानांची अशा पद्धतीनं कपडे उतरवून एअरपोर्टवर चौकशी करण्याची ही पहिलीच घटना आहे. अमेरिकन एअरपोर्टवर शाहिद अब्बासी यांचा झालेला हा अपमान पाकिस्तानच्या जिव्हारी लागलाय. 


पाकिस्तानच्या प्रत्येक चॅनलवर अब्बासी यांच्या अपमानाचा हा व्हिडिओ प्रामुख्याने दाखवला जात आहे. तसंच सोशल मीडियावरही जगभरात हा व्हिडिओ वायरल झालाय.


वायरल व्हिडिओ


सोशल मीडियावर दिसत असलेल्या या व्हिडिओमध्ये, अब्बासी यांची अगोदर कपडे उतरवून चौकशी करण्यात आली... त्यानंतर ते सामान घेऊन रवाना झाले. पाकिस्तानी मीडियाच्या म्हणण्यानुसार, हा केवळ पंतप्रधानांचा नाही तर एका राष्ट्राचा अपमान आहे.


कशासाठी होता अब्बासींचा अमेरिका दौरा?


मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान अब्बासी गेल्या आठवड्यात आपल्या आजारी बहिणीला भेटण्यासाठी अमेरिकेत गेले होते. या दौऱ्याच्या वेळी अब्बासी यांनी उपराष्ट्रवपती माइक पेंस यांचीही भेट घेतली होती.