नवी दिल्ली : भारतानं उदार मनानं पाकिस्तानी नागरिकांना मेडिकल व्हिजा देण्याचं जाहीर केल्यानंतर पाकिस्तानानं त्यावरही कूटनीतीच्या धोरणाचा अवलंब केला. या खेळीत त्यांना पाकिस्तानच्याच नागरिकांनी तोंडावर पाडलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी गरजवंत पाकिस्तानी नागरिकांना मेडिकल व्हिजा दिला जाईल, अशी भूमिका घेतली. यानंतर मोठ्या संख्येत पाकिस्तानी नागरिक मेडिकल व्हिजा घेऊन भारतात दाखल होत आहेत. 


परराष्ट्र विभागाचं वक्तव्य


या दरम्यान पाक नागरिक सुषमा स्वराज आणि भारताचं गुणगाणं गाताना थकत नाहीत. पण, पाक सरकारला मात्र काही हे पचलेलं दिसत नाही. मेडिकल व्हिजा म्हणजे भारताची एक चाल आहे. पाकिस्तानी नागरिकांना व्हिजा देऊन भारत सरकार काही त्यांच्यावर उपकार करत नाही. पाकिस्तानी नागरिक भारतीय रुग्णालयांना फी देतात आणि त्यात त्यांना कोणतीही सूट दिली जात नाही, अशी वक्तव्य पाकच्या परराष्ट्र विभागानं केलं. 


नागरिकांनी व्यक्त केला संताप


यावर, पाकिस्तानी नागरिकांनीच सरकारला धडे दिलेत. सोशल मीडियावर त्यांनी सुषमा स्वराज आणि भारताचे आभार मानतानाच पाक सरकारवर चीड व्यक्त केलीय. 


मारिया सरताज या महिलेनं सुषमा स्वराज यांना पाकच्या या दुर्दैवी वक्तव्यांकडे दुर्लक्ष करण्याचा सल्ला दिलाय. तर नबील सोएब या युझरनं असे बिनडोक वक्तव्य करणाऱ्या आपल्या देशातील नेत्यांवर टीका केलीय. त्यांच्या म्हणण्यानुसार, एक तर पाकिस्तानानं आपल्या नागरिकांसाठी ना चांगली हॉस्पीटल्स उभारली ना युनिव्हर्सिटी... आणि भारत उदारतेनं पाकिस्तानी नागरिकांना या सुविधा देत आहे तर लोक त्याचाही विरोध करत आहेत.