सियोल : पाकिस्तानला (Pakistan) पुन्हा एकदा पेचप्रसंगाचा सामना करावा लागला आहे. त्यांचे दोन राजदूत (Diplomats) दक्षिण कोरियामध्ये चोरी करताना पकडले गेले आहेत. हे दोन्ही डिप्लोमेट्स एका दुकानातून चॉकलेट आणि टोपी चोरत असताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात पकडले गेले. योंन्गसान ((Yongsan) मध्ये वेगवेगळ्या दिवशी या घटना घडल्या. हा काही पहीलाच प्रसंग नाही. याआधी अनेकदा पाकिस्तानला अशा प्रकारे शरमेने मान खाली घालावी लागली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

‘कोरिया टाइम्स’ च्या अहवालानुसार, पाकिस्तानच्या दोन राजदूतांना (Pakistan Embassy Employees) 11,000 वॉन (कोरियन चलन) आणि 1,900 वॉन सामान चोरताना पकडण्यात आले आहे. 


एकावर 10 जानेवारी रोजी 1,900 वॉन (सुमारे 1.70 डॉलर) ची चॉकलेट चोरल्याचा आरोप आहे, तर दुसर्‍यावर 1,100 वॉन (सुमारे 10 डॉलर्स) हॅटची चोरी केल्याचा आरोप आहे. 23 फेब्रुवारी रोजी ही घटना घडली.



अहवालात असे सांगितले गेले की, टोपी चोरी झाल्यानंतर स्टोअर कर्मचाऱ्याने गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू झाला. पोलिसांनी तपासासाठी स्टोअरचे सीसीटीव्ही फुटेज शोधले असता दोन्ही आरोपींची ओळख पाकिस्तानचे राजदूत म्हणून पटली. चॉकलेट चोरी प्रकरणी चौकशी सुरू आहे. तसेच दोन्ही दूतावासांविरुद्ध गुन्हा दाखल केलेला नाही.


काय आहे Vienna Convention ?


Vienna Convention नुसार, दुसर्‍या देशात असलेल्या कोणत्याही देशातील राजदूत आणि त्याच्या कुटुंबास अटक करता येणार नाही. इतकेच नव्हे तर त्यांना कोठडी किंवा चौकशीसाठीही बोलवले जाऊ शकत नाही. जरी पाकिस्तानी राजदूतांना अटक करण्यात आली नसली तरी हा विषय उघड झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानची नाचक्की झाली. या संपूर्ण प्रकरणात पाकिस्तानकडून आतापर्यंत कोणतेही विधान समोर आले नाही.