मुंबई : पाकिस्तानच्या लाहोरमधून एक आश्चर्यकारक प्रकरण समोर आले आहे. येथे एका पोलीस उपनिरीक्षकाने एका महिलेसमोर आपली पॅन्ट उघडली आणि तिला प्रायव्हेट पार्ट दाखवला. आरोपी उपनिरीक्षक एवढ्यावरच थांबले नाहीत. त्याने महिलेला अपशब्दात शिवीगाळही केली. घटनास्थळी उपस्थित लोकांनी या घटनेचा व्हिडीओ बनवला, जो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही घटना पाकिस्तानातील लाहोरमधील शादबाग पोलीस ठाण्याच्या परिसरात घडली. हा पोलीस उपनिरीक्षक पीडित महिलेच्या दोन मुलांना अटक करण्यासाठी आपल्या संपूर्ण टीमसह आला होता. जेव्हा महिलेने पोलिसांना रोखण्याचा प्रयत्न केला आणि तिच्या मुलांचा गुन्हा विचारला, तेव्हा उपनिरीक्षक संतापले आणि त्यांनी महिलेला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यानंतर त्याने आपले कपडे काढल.


विशेष म्हणजे हा, या घटनेचा कोणीतरी व्हिडीओ काढला जो सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर लाहोर पोलीस प्रशासनाने आरोपी उपनिरीक्षकावर कारवाई केली आणि त्याला निलंबित केले आहे. आरोपीला अटक करण्यात आले आहे. त्यानंतर सगळ्या प्लॅटफॉर्मवरुन हा व्हिडीओ हटवण्यात आला आहे.



या घटनेवर डीआयजी साजिद कयानी म्हणाले की, या प्रकरणाच्या तपासात उपनिरीक्षक दोषी आढळले आहेत. त्याला निलंबित करण्यात आले आहे. त्याच्यावर कडक कारवाई केली जात आहे.


पीडित महिलेच्या दोन मुलांना अटक करण्यासाठी पोलीस गेले होते, पण जेव्हा त्या महिलेने हस्तक्षेप करून त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा पोलीस देखील, त्या महिलेला पोलीस व्हॅनमध्ये घेऊन पोलीस स्टेशनला घेऊन गेले.



त्याचवेळी, उपनिरीक्षकाने आपल्या स्पष्टीकरणात सांगितले की, परिसरात हवाई गोळीबाराचा आवाज ऐकून तो तेथे पोहोचला होता. जेव्हा त्याने आरोपीला अटक करण्यास सुरुवात केली तेव्हा आरोपीचा भाऊ आणि आईने त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. त्याने पोलिसांच्या कामात अडथळा आणला. म्हणून त्यांना देखील पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आले आहे.