इस्लामाबाद : मागील वर्षी भारतात पुलवामा (Pulwama) येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याबाबत पाकिस्तानने (Pakistan) प्रथमच जाहीर कबुली दिली आहे. पंतप्रधान इम्रान खान यांच्या नेतृत्वाखाली पुलवामा येथे पाकिस्तानने भारताला प्रत्युत्तर दिल्याचे पाकिस्तानचे केंद्रीय मंत्री फवाद चौधरी (Fawad Choudhary) यांनी संसदेत सांगितले. या दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले.


आम्ही भारतात घुसून मारले : फवाद चौधरी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाकिस्तानी संसदेत फवाद चौधरी म्हणाले, 'अय्यास सादिक साहेब काल येथे बोलले. तुम्हाला आदर देण्यात आला, तुम्ही संसदेच्या सभागृहात बोलत आहात आणि मग तुम्ही इतक्या आत्मविश्वासाने खोटे बोलता की, एक खोटा माणूसदेखील तसे बोलेल. अध्यक्षांचे पाय थरथर कापत आहेत भारत हल्ला करेल म्हणून, हे असे बोलणार्‍यांना सांगू इच्छतो की आम्ही भारतात घुसून आणि मारले. पुलवामामध्ये आपले जे यश आहे ते इम्रान खान यांच्या नेतृत्वाखाली यश आहे. याचे साथीदार आपण सगळे आहोत आणि माझ्यासह तुम्हीही आहात. 


पाकिस्तानच्या कबुलीने भारताच्या दाव्याला बळकटी


पाकिस्तानच्या मंत्र्यांची ही कबुलीदिल्याने भारताच्या दाव्याला आता अधिक बळकटी मिळाली आहे. केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री व्ही.के. सिंह म्हणाले की, पुलवामा हल्ल्याबाबत सुरुवातीपासूनच सगळे संकेत पाकिस्तानकडून मिळत होते. आता याबाबत पाकिस्तानेच ते कबुल केले आहे. पाकिस्तानने ही बाब स्वीकारली ही एक चांगली गोष्ट आहे. पाकिस्तानच्या या कबुलीचा वापर भारत आता एफएटीएफमध्ये काळ्या यादीत टाकण्याची करेल. 



दहशतवादाचा शेवटचा अंत होणार


जम्मू-काश्मीरमध्ये यावेळी अतिरेकी त्यांचे शेवटचे श्वास मोजत आहेत. सुरक्षा दलाने एक-एक करून दहशतवाद्यांना लक्ष्य केले आहे. ही गोष्ट जगातील दहशतवादाचा सर्वात मोठा आधार असलेल्या पाकिस्तानला मान्य नाही. अशा परिस्थितीत दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा काश्मीरमधील भाजप नेत्यांना लक्ष्य केले आहे. गुरुवारी सायंकाळी उशिरा दहशतवाद्यांनी कुलगाममध्ये हल्ला करून भाजपच्या तीन नेत्यांच्या कारवर हल्ला केला.


दहशतवाद्यांनी भाजपच्या तीन नेत्याना ठार मारले


मिळालेल्या माहितीनुसार, भाजपृ युवा मोर्चाचे सरचिटणीस फिदा हुसेन हे त्यांचे दोन सहकारी उमर रमजान आणि आरोन बेग यांच्यासमवेत घराकडे जात होते. परतीच्या वाटेवर वाईके पोरा भागात हल्लेखोर लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी त्याच्या गाडीवर गोळीबार सुरू केला. या हल्ल्यात भाजप युवा आघाडीच्या जिल्हा सरचिटणीस फिदा हुसेन यांचा कुलगाम येथे जागीच मृत्यू झाला. उर्वरित दोघांचा रुग्णालयात मृत्यू झाला.


भाजप कार्यकर्त्यांच्या हत्येचा निषेध : पंतप्रधान


'आमच्या तीन तरुण कार्यकर्त्यांच्या हत्येचा मी निषेध करतो. जम्मू-काश्मीरमध्ये उत्कृष्ट काम करणारे ते एक उज्ज्वल तरुण होते. या दु:खाच्या वेळी माझे विचार त्याच्या कुटुंबीयांसमवेत आहेत. त्याचा आत्मा शांती लाभो. '


टीआरएफने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली


द रेजिस्टेंस फ्रंटने (TRF) भाजप नेत्यांवरील हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. टीआरएफ ही लष्कर-ए-तैयबाची प्रमुख संघटना मानली जात आहे. दहशतवादी संघटना टीआरएफनेही पुढील हल्ल्याची धमकी दिली आहे. 


दरम्यान, पीडीपी आणि नॅशनल कॉन्फरन्स हत्येला निषेध केला आहे. पीडीपी आणि नॅशनल कॉन्फरन्सनेही काश्मीरमधील भाजप कार्यकर्त्यांवरील हल्ल्याला विरोध दर्शविला आहे. पीडीपी अध्यक्ष मेहबूबा मुफ्ती यांनी भाजप कार्यकर्त्यांच्या हत्येबद्दल दुःख व्यक्त केले आहे. त्याचबरोबर नॅशनल कॉन्फरन्सचे नेते आणि माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी ट्विट करून या हल्ल्याचा निषेध केला आहे.