गर्लफ्रेण्डसमोर पोपट असं काही बोलला की थेट ब्रेकअप झालं; बॉयफ्रेण्डच्या घरातला किस्सा वाचाच
Parrot Expose Boyfriend In Front Of Girlfriend: घरातील सर्वात बडबड्या पाळीव प्राणी म्हणजे पोपट. अनेकदा पोपटाच्या पोपटपंचीमुळे मालकांची गोची होते. असाच प्रकार नुकताच समोर आला.
Parrot Expose Boyfriend In Front Of Girlfriend: घरातील पाळीव प्राण्यांमध्ये सर्वात बडबडणारा प्राणी म्हणून पोपट प्रसिद्ध आहे. हा पक्षी शिकवलेलं बोलण्याबरोबरच मालकाला पाहिल्यानंतर बडबड करण्यासाठीही ओळखला जातो. पोपट हा पक्षी आवाजाची नक्कल करम्यासाठी आणि वेगवेगळे आवाज काढण्यासाठी प्रसिद्ध आहे. अनेकदा उत्साहात पोपट असं काही बोलून जातो की मालकाला तोंड लपवायला जागा राहत नाही. अशाच एक प्रकार नुकताच घडला. एका पाळीव पोपटाने मालकाच्या प्रेयसीसमोर असं काही विधान केलं की दोघाचं नातं संपुष्टात आलं. या तरुणीनेच सोशल मीडियावर घडलेला संपूर्ण प्रसंग सांगितला आहे.
सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म रेडिटवर अनेकजण त्यांच्याबरोबर घडलेले विचित्र प्रकार पोस्टच्या माध्यमातून शेअर करत असतात. या ठिकाणी फेसबुक किंवा इतर माध्यमांप्रमाणे खऱ्या नावासहीत पोस्ट लिहिणं बंधनकारक नसतं. त्यामुळे अनेकजण आपल्या मनातील भावना घडलेला किस्से या माध्यमावर शेअर करुन इतरांना याबद्दल काय वाटतं हे शेअर करतात. एका तरुणीने असाच किस्सा या प्लॅटफॉर्मवर शेअर केला आहे जो वाचून तुम्हालाही धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. रिलेशनशीप अॅडव्हाइज नावाच्या ग्रुपवर अॅलेक्सा सॅटीलीटो नावाच्या युझरने तिच्या प्रियकराच्या घरी आलेला अनुभव शेअर केला आहे.
नक्की घडलं काय?
सोशल मीडियावरुन स्वत:बरोबर घडलेला प्रकार सांगताना 25 वर्षीय तरुणीने ती कशापद्धतीने एका पोपटामुळे अडचणीत आली हे सांगितलं आहे. आपल्या जॉनी नावाच्या 26 वर्षीय प्रियकराच्या घरी गेल्यानंतर नेमकं काय घडलं याची सविस्तर माहिती या तरुणीने दिली आहे. जॉनीच्या घरी ही तरुणी फॅमेली डीनरसाठी गेली होती. प्रियकराच्या घरी त्याचे आई-वडीलही होते. प्रियकराच्या घरी त्याचा पाळीव पोपटही होता. या पोपटाचं नाव पार्सी असं होतं. पार्सी नावाचा हा पोपट रात्रभर या तरुणीसमोर जेस नावाच्या मुलीचं नाव घेत होता. जॉनी जेसवर प्रेम करतो असं हा पोपट सांगत होता, असं या तरुणीने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. मात्र जेस नावाची कोणतीच तरुणी जॉनीच्या कुटुंबात नसल्याचं किंवा आपण तिला ओळखत नसल्याचं जाणवलं. तसेच जेव्हा जेव्हा पोपट जेसचं नाव घ्यायचा तेव्हा जॉनी गोंधळून जायचा, असं या मुलीने पोस्टमध्ये लिहिलं आहे. डिनर सुरु असतानाही जॉनी त्याच्या मोबाईलकडे पाहून गोंधळून फोनची उलटा करुन टेबलवर ठेवत होता. या साऱ्या प्रकारानंतर या तरुणीने प्रियकराला हा संपूर्ण काय प्रकार आहे? तो पोपट कोणाबद्दल बोलत होता? असे प्रश्न विचारले. हे प्रश्न ऐकून प्रियकर संतापले. तो प्रेयसीवर ओरडू लागला. एका पोपटाच्या सांगण्यावरुन ती तिच्या प्रियकरावर संशय घेत असल्यावरुन दोघांमध्ये वाद झाला.
अनेकांनी मांडली मतं
या वादानंतर माझं जॉनबरोबर भाडंणं झालं. त्याचा पालकांनी मला समजावण्याचा प्रयत्न केला. पण मी तिथून निघून आले. तेव्हापासून आतापर्यंत आमच्यात बोलणं झालेलं नाही, असं या मुलीने पोस्टच्या शेवटी म्हटलं आहे. मी माझ्या ठिकाणी बरोबर आहे की चुकलेय असं या तरुणीने पोस्टच्या शेवटी म्हटलं आहे. अनेकांनी कमेंट करुन प्रतिक्रिया नोंदवताना तुला मुलापासून वेगळं व्हायचं आहे की नाही हे ठरवावं लागेल असं म्हटलं आहे. अन्य एकाने विचारपूर्वक सर्व तपास करुनच पुढचा निर्णय घे असा सल्ला या मुलीला दिला आहे.