Viral News: जगात अनेक विचित्र ठिकाणं असून त्या ठिकाणांबद्दल वाचल्यानंतर आश्चर्याचा धक्का बसतो. कधी कधी या गोष्टी खोट्या असल्याचं वाटतं, तर कधी या गोष्टी खऱ्या असतील का? असा प्रश्न पडतो. आज आम्ही अशाच एका विचित्र ठिकाणाबद्दल सांगणार आहोत. रेस्टॉरंटमध्ये जेवल्यानंतर आपण घरी येतो. मात्र या रेस्टॉरंटमध्ये पोट भरून जेवल्यानंतर भिंत चाटण्यास प्रवृत्त केलं जातं. कदाचित तुम्हाला ही बातमी खोटी वाटेल, पण हे खरं आहे. अमेरिकेतील एरिजोना शहरातील स्कॉट्सडेलमधील 'द मिशन' रेस्टॉरंटमध्ये भिंत चाटण्यास सांगितलं जातं. रेस्टॉरंट मालक त्यांच्या ग्राहकांना भिंत चाटण्यासाठी का प्रोत्साहित करतात? जाणून घेऊयात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमेरिकेच्या मिशन रेस्टॉरंटमध्ये ही भिंत 17 वर्षांपूर्वी बांधली आहे आणि त्याची चव गेल्या 17 वर्षांपासून कायम आहे. म्हणूनच या रेस्टॉरंटमध्ये येणारा प्रत्येकजण या स्वादिष्ट भिंत चाटण्यास उत्सुक असतो. ही स्वादिष्ट भिंत गुलाबी हिमालयीन सॉल्ट म्हणजेच गुलाबी मीठापासून बनवली आहे. त्यामुळे लोकांना त्याचा आस्वाद घ्यावासा वाटतो. या रेस्टॉरंटच्या कर्मचाऱ्यांनीही त्यावर कोणतेही बंधन घातलेले नाही. WLBT3 नुसार, ही स्वादिष्ट गुलाबी हिमालयीन मीठाची भिंत रेस्टॉरंटच्या हेडशेफने येथे आणली होती. ही चविष्ट भिंत येथे जेवायला येणाऱ्या लोकांमध्ये खूप प्रसिद्ध आहे.


रेस्टॉरंटमध्ये येणारे ग्राहक जर ही भिंत चाटत असतील तर त्यातून आजार पसरणार तर नाही ना? असा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही. ही भिंत गुलाबी हिमालयन सॉल्टपासून बनवल्याने कोणताही आजार पसरत नाही, असं रेस्टॉरंटचे कर्मचारी सांगतात. या भिंतीच्या आत स्वच्छतेचे गुणधर्म असल्याचा दावा कर्मचाऱ्यांनी केला आहे. पण तरीही रेस्टॉरंटचे कर्मचारी दररोज ही भिंत पुसून स्वच्छ करतात.