नवी दिल्ली : देशात पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमती नागरिकांच्या चिंतेत भर घालत आहेत. पण, काही असेही देश आहेत जिथल्या नागरिकांना पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतींची चिंता सतावत नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एक देश असाही आहे जिथे पेट्रोल केवळ ६५ पैसे प्रति लिटर उपलब्ध आहे. म्हणजेच इथं केवळ ७-८ रुपयांत बाईकची टाकी आणि २०-३० रुपयांत गाडीची टाकी पूर्ण भरली जाते. हा देश आहे  वेनेझुएला...


पेट्रोल आहे पण अन्न नाही...


ग्लोबल पेट्रोल प्राईसनं (www.globalpetrolprices.com) दिलेल्या माहितीनुसार, वेनेझुएलामध्ये २ एप्रिल २०१८ रोजी पेट्रोलच्या किंमती अमेरिकन डॉलरच्या मानानं १०० व्या भागाबरोबर (जवळपास ६५ पैसे) आहे.


उल्लेखनीय म्हणजे, वेनेझुएलामध्ये महागाईची स्थिती इतकी भयंकर आहे की लोकांकडे खायला अन्नही नाही. कुणी एकवेळचं अन्न खाऊन झोपतंय तर कुणी भीक मागून आपल्या एकावेळच्या जेवणाची सोय करतंय. महत्त्वाचं म्हणजे, वेनेझुएला एकेकाळी साऊथ अमेरिकाचा सर्वात श्रीमंत देश होता. परंतु, सध्या इथली अर्थव्यवस्था पार कोसळलीय.


भारताचे पेट्रोलियम मंत्रीही चिंतेत


गेल्या काही दिवसांत भारतात पेट्रोलियम मंत्र्यांनीही वाढत्या किंमतींबद्दल चिंता व्यक्त केली होती. परंतु, सरकारन्ं पेट्रोल-डिझेलवरची एक्साइज ड्युटी तत्काळ प्रभावानं हटवण्यास नकार दिला. 


ग्लोबल मार्केटमध्ये तेलाच्या किंमती वाढल्यानं डिझेल सर्वोच्च स्तरावर पोहचलंय. तर पेट्रोल चार वर्षांच्या उच्च स्तरावर दाखल झालंय. जून २०१७ नंतर पेट्रोल-डिझेलच्या किंमती दररोज ठरतात. यामुळे पेट्रोल-डिझेलच्या किंमतींतील बदल एकदम जाणवत नाहीत. 


आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किंमती वाढल्यानं घरगुती बाजारातही दबाव दिसून येतोय. अशावेळी पेट्रोल-डिझेलच्या किंमती दररोज ठरवल्यानं नियंत्रणात राहतील, असं सरकारनं म्हटलं होतं. परंतु असं झालेलं दिसत नाही. 


या देशांत पेट्रोल आहे सर्वात स्वस्त...


वेनेझुएला -  जवळपास ६५ पैसे प्रति लिटर 


सुदान -  जवळपास २२.१० पैसे प्रति लिटर 


कुवैत -  जवळपास २२.७५ पैसे प्रति लिटर 


इराण -  जवळपास २३.४० पैसे प्रति लिटर 


अल्जेरिया -  जवळपास २४.०५ पैसे प्रति लिटर