मोठी बातमी : कोरोना लसीची चाचणी दुसऱ्या टप्प्यात
आतापर्यंत कोरोनाने संपूर्ण जगभरात दहशत पसरवली आहे
बिजिंग : CoronaVirus कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव जगभरात थैमान घालत असतानाच त्यावर शक्य त्या सप् परिंनी प्रतिबंधात्मक उपाय योजले जात आहेत. शिवाय अनेक संशोधक, डॉक्टर या विषाणूवर उपायकारक ठरणारी लस तयार करण्यासाठी अतोनात प्रयत्न करत आहेत. याच प्रयत्नांमध्ये आता चीनने बाजी मारल्याची माहिली समोर आली आहे.
'ग्लोबल टाईम्स'च्या वृत्तानुसार china चीनच्या वतीने अतिशय महत्त्वपूर्ण अशा दुसऱ्या टप्प्यावर कोरोना लसीची ही चाचणी पोहोचली आहे. या चाचणीसाठी जवळपास ५०० स्वयंसेवकांची निवड करण्यात आली आहे. ज्यामध्ये वुहान प्रांतातील एका ८४ वर्षीय नागरिकाचाही समावेश आहे. चीनच्या वुहान प्रांतातूनच कोरोना विषाणूचा जगभरात फैलाव झाला होता. ज्यानंतर आता जवळपास संपूर्ण जगाला या जीवघेण्या विषाणूचा विळखा बसला आहे.
Institute of Biotechnology, Academy of Military Medical Sciences of China च्या संशोधन चमूने PLA Major General Chen Wei यांच्या मार्गदर्शनाअंतर्गत लस शोधण्याचं काम सुरु आहे. या चाचणी प्रक्रियेत संशोधकांनी जेनेटीक इंजिनिअरिंग पद्धतीचा वापर केला. दरम्यान, लस चाचणीच्या पहिल्या टप्प्यात म्हणजेच क्लिनिकल ट्रायलमध्ये सुरक्षिततेचा आढावा घेण्यात आला होता. ज्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यात लसीच्या कार्यक्षमतेची पडताळणी होणार आहे. पहिल्या टप्प्याहून जास्त स्वयंसेवकांचा समावेश या टप्प्यात असणार आहे.
मार्च महिन्यात क्लिनिकल ट्रायल पार केल्यानंतर आता मानवी चाचणीच्या टप्प्यापर्यंत पोहोचलेला चीन हा आतापर्यंतचा पहिला देश असल्याचं कळत आहे. त्यामुळे आता या टप्प्याच्या अंतिम अहवालाकडेच साऱ्या विश्वाच्या आशावादी नजरा लागल्या आहेत.