मुंबई : सुर्यमाला, आकाशगंगा हे आणि असे अनेक शब्द आपण शालेय जीवनात ऐकले. अभ्यासक्रमादरम्यान नकळतच आपण पर्यावरण, निसर्ग आणि त्यातीच अद्वितीय घटकांची ओळख करुन देताना दिसलो. यातूनच मग आपल्याला या घटकांविषयी कमाल कुतूहल निर्माण व्हायला लागतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

असाच एक कुतूहलाचा विषय हाताळत एका फोटोग्राफरनं अद्वितीय व्हिडीओ सोशल मीडियावर सर्वांच्या भेटीला आणला आहे. या छायाचित्रकारानं सौरवादळ अर्थात सोलर स्टॉर्म त्याच्या कॅमेरामध्ये कैद केलं आहे. पृथ्वीपेक्षाही चारपट मोठ्या आकाराचं हे वादळ पाहतानाही धडकी भरवत आहे. (photographer recorded solar storm in his camera watch magnificant Video)


चक अयूब (Chuck Ayoub) यानं दुर्बिण आणि कॅमेराच्या माध्यमातून या वादळाची तीव्रता सर्वांसमक्ष आणली. त्यानं शेअर केलेल्या एका व्हिडीओमध्ये एका तासाच्या कालावधीत सोलार प्लाज्माचे ढग तासाभराच्या कालावधीत चालताना दिसले. 


इन्स्टाग्रामवर सौर वादळाचा व्हिडीओ पोस्ट करताना या छायाचित्रकारानं कॅप्शनमध्ये लिहिलं, मी सुर्याची ही रुपं टीपताना मला या गोष्टींचा अंदाजच नव्हता. एका अद्वितीय वादळाला मी दुर्बीणीच्या मदतीनं पाहिलं. व्हिडीओमध्ये प्लाज्मा थेट 5500 अंश इतक्या तापमानावर पोहोचत असल्याचंही पाहायला मिळत आहे. 


'न्यूजवीक'च्या माहितीनुसार सौर वादळ म्हणजे सुर्याच्या पृष्ठातून विद्युत चुंबकीय विकिरणांचे मोठे स्फोट. सौर ज्वाला फक्त प्रकाश आणि इतर विद्युत चुंबकीय विकीरणांचा उत्सर्ग करते. 



सध्या हा व्हिडीओ शास्त्रज्ञ आणि विशेष म्हणजे खगोलशास्त्रज्ञांमध्ये बराच चर्चेत आला आहे. नेटकरीही हा व्हिडीओ एकसारखा पाहताना दिसत आहेत.