Money News : लहानपणापासूनच आईवडील किंवा घरातली मोठी मंडळी आपल्याला काही चांगल्या सवयी लावताना दिसतात. त्यातचील एक सवय म्हणजे पैसे साठवण्याची. अवाजवी खर्च टाळत या खर्चाऐवजी पैसे साठवून मग गरज असेल तेव्हा ते वापरण्याचा सल्ला आपल्याला आयुष्यभर दिला जातो. याची सुरुवात होते बालवयापासून. जेव्हा घरातल्या थोरामोठांनी दिलेले पैसे पिगी बँकमध्ये ठेवून मग एखाद्या प्रसंगी आपल्या आवडीची गोष्ट घेण्यासाठी वापरले जातात. पुढे जाऊन साठवलेले पैसे, भविष्यात होणारा त्यांचा वापर या सर्व संकल्पनाही बदलू लागतात. पिगी बँकची जागा मोठी बँक घेते, जिथं साठवली जाणारी रक्कमही तितकीच मोठी असते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

थोडं मागे वळून पुन्हा बालपणात डोकावलं तर, तुम्हाला त्या पिगी बँकचा आकार आठवतोय का? पिगी बँक नाही तर, ज्या मातीच्या भांड्यात तुम्ही पैसे साठवत होतात त्याचा आकार आठवतोय का? या साऱ्याचा Pig शी नेमका काय संबंध? तुम्हालाही असे प्रश्न पडले असतील. 


PYGG नावाची माती आणि पिगी बँक 


असं म्हणतात की, 15 व्या शतकापासून पिगी बँकचा वापर सुरु झाा होता. त्यावेळी काच किंवा धातूची भांडी महाग असल्यामुळं मातीच्या भांड्यांचा वापर होत असेल. या मातीला PYGG असंही म्हटलं जायचं. तेव्हा पैसे साठवण्यासाठीचं भांडंसुद्धा याच मातीपासून बनवलं जायचं. त्यावरूनच त्या भांड्याला PYGGY असं म्हटलं जाऊ लागलं. 


हेसुद्धा पाहा : Mount Everest वरील प्रचंड गर्दीचा 'तो' फोटो कुणी काढलेला माहितीये? पाहा कॅमेरामागचा चेहरा 


सुरुवातीच्या दिवसांमध्ये हे PYGG बँक किंवा PYGGY बँक पूर्णपणे बंद होते. पैसे आत जातील इतकीच जागा सोडली जात होती. गरजेच्या वेळी हे PYGGY तोडून त्यातून पैसे मिळवले जात होते. काळ पुढे गेला, PYGGY बँक ची जागा काही कलात्मक गोष्टींनी घेतली. पण, त्यांची लोकप्रियता कमी झाली नाही. 


इंग्लंडमध्ये 19 व्या शतकात कुंभारांनी या मातीच्या भांड्यांना आकर्षक आकार देण्यास सुरुवात केली. लहान मुलांमध्येही लोकप्रियता मिळवण्याच्या हेतूनं या PYGGY ला Pig चा आकार देण्यात आला. हा प्रयोग इतका यशस्वी ठरला की, पिगी बँकचं प्रस्थ जगभरात पसरलं आणि स्थिरावलंसुद्धा. आजही अनेकांकडेच ही पिगी बँक आहे, काहीजणांकडे Pig च्या आकाराची पिगी बँक नसली तरीही ही मंडळी पैसे साठवतात त्या भांड्याचा उल्लेख मात्र पिगी बँक म्हणूनच करतात. कमाल म्हणावी ना?