Viral Video : महिलेच्या मांडीवर असलेल्या Puppy वर पिटबुलचा हल्ला, त्याला ओढत नेत त्याने...
Viral Video : पिटबुल हा सर्वात धोकादायक श्वानंपैकी एक आहे. पिटबुलने एका Puppy वर हल्ला केला. हा धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
PitBull Attack Video Viral : गेल्या काही महिन्यांपासून पाळीव कुत्र्याचा हल्ल्याचे प्रमाण झपाट्याने वाढलं आहे. कुत्र्याच्या हल्ल्यात अनेकांची नाहक बळीही गेले आहे. PitBull हा सर्वात धोकादायक श्वान आहे. पिटबुलच्या हल्ल्याचा एक खतरनाक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येतो. हृदय पिळवटून टाकणारा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे.
Puppy त्याने ओढत नेलं अन्
सोशल मीडियावरील हा व्हिडीओ एका रेस्टॉरंटमधला आहे. तु्म्ही पाहू शकता एका टेबलवर दोन महिला बसल्या आहेत. त्यापैकी एकीच्या मांडीवर गोड आणि लोभसवाण असं छोटसा Puppy मस्त बसला आहे. अचानक त्या Puppy वर पिटबुल हल्ला करतो. या हल्ल्यानंतर रेस्टॉरंटमधील प्रसन्न वातावरण दहशतीखाली येतं आणि किंकाळ्या ऐकायला येतात.
त्या Puppy ला तो महिलेच्या मांडीवरुन ओढत नेतो. त्या पिटबुलने पिल्लाची मान त्याचा जबड्यात घट्ट धरुन ठेवलेलं असतं. त्या Puppyचा जीव वाचविण्यासाठी प्रत्येक जण धडपड करत होता. मन अस्वस्थ करणारा हा व्हिडीओ पाहून अंगावर शहारा येतो.
एका क्षणी तुम्ही व्हिडीओमध्ये पाहू शकता निष्पाप पिल्लाच्या मालकाला त्याचा रक्ताने माखलेला कान जमिनीवरुन उलण्याची वेळ आली. हे अतिशय घृणास्पद आणि तितकंच त्रासदायक दृश्यं होतं. (Pit Bull Attack on Puppy snatches little dog from woman Video Viral on Internet Trending today )
निळा शर्ट घातलेला एका ग्राहकाने पिटबुलला लाथ मारली. तर पांढरा शर्ट घातलेला दुसऱ्या ग्राहकाने तोंड उघडण्याचा प्रयत्न करत होता. एका क्षणाला त्या ग्राहकाने पिटबुलच्या तोंडाला ठोसा मारला. या दोन तरुणांच्या अथक प्रयत्नानंतर Puppyची त्या निदर्यी पिटबुलच्या जबड्यातून सुटका झाली.
हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉम ट्वीटरवरील Crazy Clips या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे.