नवी दिल्ली : टर्की विमानतळावर लँडिंग करताना प्रवासी विमान बोईंग 737-800 ला अपघात झाला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विमान अपघातात सर्व प्रवाशी सुखरुप आहेत. घटनेची माहिती मिळतात तेथे मदतकार्य सुरु झालं. माहितीनुसार पेगसस एअरलाइन्सचे हे विमान आहे. टर्कीची राजधानी अंकारा येथून त्याने उड्डाण केलं होतं. 


लँडिंगच्या काही वेळानंतर हे विमान अचानक धावपट्टीवरुन बाजुला झालं. ब्लॅक सीमध्ये हे विमान घसरत होतं पण तसं नाही झालं आणि मोठा अपघात टळला. समुद्रात जर हे विमान गेलं असतं तर अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहेत.


मीडिया रिपोर्टसनुसार जेव्हा अपघात झाला त्यावेळी विमानाचा वेग सुमारे 200 किमी प्रति तास होता. प्रवाशांच्या मते, पावसामुळे रनवे ओला झाला होता. त्यामुळे विमान धावपट्टीवरुन सरकलं. यामध्ये जवळपास १६८ प्रवासी होते.


पाहा व्हिडिओ