Plastic in Mineral Water:  पाण्याशिवाय माणूस जिवंत राहू शकत नाही. दूषित पाणी आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. यामुळेच घराबाहेर असल्यावर अनेक जण बाटलीबंद अर्थात मिनरल वॉटर पितात. मात्र, हेच बाटलीबंद पाणी विष ठरु शकते. कारण, एल लिटरच्या सीलबंद पाण्याच्या बाटलीत  प्लास्टिकचे 2.4 लाख तुकडे आढळले आहेत. एका संशोधनादरम्यान ही धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मायक्रोप्लास्टिक हे एक मायक्रोमीटर इतकं लहान असू शकते. म्हणजेच मीटरच्या दशलक्षव्या भागापर्यंत किंवा 5 मिमी पर्यंत. नॅनोप्लास्टिक हे मायक्रोमीटरपेक्षा लहान म्हणजेच अत्यंत सूक्ष्म असू शकतात. मीटरचा शंभर दशलक्षवावा भाग. कोलंबिया विद्यापीठातील संशोधकांनी याबाबत संशोदन केले.  अमेरिकेत विकल्या जाणार्‍या वेगवेगळ्या ब्रँडच्या बाटलीबंद पाण्याचे परीक्षण कोलंबिया विद्यापीठातील संशोधकांनी केली. 


संशोधनात धक्कादायक खुलासा


संशोधनादरम्यान प्रत्येक बाटलीमध्ये 100 नॅनोमीटर प्लास्टिकचे कण आढळून आले आहेत. प्रत्येक लिटरमध्ये 1.1 ते 3.7 लाख नॅनोमीटर प्लास्टिक आढळून आले आहेत. तर, उर्वरित मायक्रोप्लास्टिक आहे. या बाटलीत आढलेल्या 2.4 लाख मायक्रोप्लास्टिक्सपैकी 90 टक्के नॅनोप्लास्टिक्स आहेत. प्रोसिडिंग्ज ऑफ द नॅशनल अॅकॅडमी ऑफ सायन्सेस या जर्नलमध्ये या संशोधनाचा खुलासा प्रसिद्ध करण्यात आला आहे.
कोलंबिया क्लायमेट स्कूलच्या लॅमोंट-डोहर्टी अर्थ वेधशाळेतील पर्यावरण रसायनशास्त्रज्ञ आणि या अभ्यासाचे सह-लेखक बिजन यान यांनी संशोधनाबाबत अधिक माहिती दिली.  बाटलीबंद पाण्यातील प्लास्टिक हे नागरीकांच्या आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक आणि विषारी ठरू शकते. 


बाटलीबंद पाण्याच्या बाटलीत शेकडो प्रकारचे प्लास्टिक


बाटलीबंद पाण्याच्या बाटलीत शेकडो प्रकारचे प्लास्टिक आढळून आले आहेत. या पैकीकी पॉलियामाइड म्हणजे विशेष प्रकारचा नायलॉन प्लास्टिक हे देखील अत्यंत घातक आहे. पीईटी नंतर सर्वात जास्त आढळते. प्लास्टिकच्या फायबरपासून हे तयार होते. बाटलीबंद पाणी उत्पादन कारखान्यांमध्ये पाणी शुद्ध करण्यासाठी याचा वापर केला जाते. याशिवाय बाटलीबंद पाण्यात पॉलिस्टीरिन, पॉलिव्हिनाईल क्लोराईड आणि पॉलिमेथेक्रेलेटसारखे केमिकल प्लास्टिकही सापडले आहे. संशोधनादरम्यान एक लिटर बाटलीबंद मिनरल वॉटरमध्ये सात प्रकारचे सामान्य प्लास्टिक आढळून आले आहेत. नॅनोप्लास्टिकच्या केवळ ते 10 टक्के आहे. 


खास तंत्रज्ञानाद्वारे शोधले प्लास्टिक  


बाटलीबंद पाण्यात प्लास्टिकचा अभ्यास करण्यासाठी वैज्ञानिकांनी नवीन तंत्र विकसित केले आहे. सिम्युलेटेड रमन स्कॅटरिंग मायक्रोस्कोपीद्वारे हे प्लास्टिक शोधण्यात आले आहे. दोन लेझर बीम एकाच वेळी फायर करुन पाण्याच्या आत असलेल्या कणांमधील मायक्रोप्लास्टिक शोधले जाते.