मनिला : फिलीपीन्समध्ये सुरु असलेल्या आशियाई देशांच्या समिटचा आज तिसरा दिवस आहे. पंतप्रधान मोदींनी वियतनामचे पंतप्रधान गुएन शुन फुक आणि जपानते पंतप्रधान शिंजो आबे यांची भेट घेतली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


याआधी पंतप्रधान मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान मॅल्कम टर्नबुल यांच्यात द्विपक्षीय बैठक झाली.



मंगळवारी द्विपक्षीय बैठकी शिवाय पंतप्रधान मोदी पूर्व आशिया आणि आशियान भारत सम्मेलनाला संबोधित करणार आहेत.



सोमवारी पंतप्रधान मोदींनी मनिलामध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांची भेट घेतली. दोघांनी संकल्प घेतला की, जगातील दोन महान लोकशाही देशांमध्ये सर्वोत्तम सेना असली पाहिजे. ट्रंप यांच्या भेटीनंतर पंतप्रधान मोदींनी म्हटलं होतं की, 'आम्ही संपूर्ण जग आणि अमेरिकेच्या अपेक्षांवर खरं उतरायचं प्रयत्न करु. या बैठकीत दोन्ही देशाच्या नेत्यांनी आशियाचं भविष्य आणि संबंधांवर चर्चा केली. मोदींनी म्हटलं की, अमेरिका आणि भारत मिळून संपूर्ण जगाचं भविष्य बदलू शकतो.'


याआधी पीएम मोदींनी आशियामधील व्यापार आणि गुंतवणूक संम्मेलनाला संबोधित करत म्हटलं की, 'आमच्या सरकारने देशामध्ये व्यापार सोपा केला आहे.'