political news : सध्या भारतातच नव्हे, तर जागतिक स्तरावर अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. या सर्व घडामोडींमध्येच नुकताच एका घटनेचा व्हिडीओ समोर आला आणि अनेकांच्या पायाखालची जमीन सरकली. कारण, पत्रकार परिषद सुरु असताना अचानकच हातात कॅमेरा आणि माईक असणाऱ्या पत्रकारांच्या घोळक्यातून एका इसमानं समोर येत विरोधी पक्षनेत्यांवर जीवघेणा चाकूहल्ला केला. 


कुठे घडली ही घटना?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विरोधी पक्षनेत्यांवरील या हल्ल्याची बातमी वाऱ्याच्या वेगानं पसरली आणि पाहता पाहता जगभरात या व्हिडीओमुळं चिंतेची लाट पसरली. दक्षिण कोरियामध्ये घडलेल्या या घटनेमध्ये विरोधी पक्षनेता ली जे-म्युंग यांच्यावर हा हल्ला करण्यात आला. द. कोरियातील बुसान या शहरामध्ये एका पत्रकार परिषदेदरम्यान त्यांच्यावर हा हल्ला झाला. पत्रकारांच्या घोळक्याचा फायदा घेत म्युंग यांच्यावर चाकूहल्ला करणाऱ्या हल्लेखोराला तातडीनं पोलिसांनी ताब्यात घेतलं. दरम्यान, या हल्ल्यात गंभीर स्वरुपात जखमी झालेल्या म्युंग यांना तातडीनं रुग्णालयात नेण्यात आलं. योनहाप वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार रुग्णालयात नेतेवेळी ते शुद्धीतच होते. 


हेसुद्धा वाचा : MHADA कडून नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच दणदणीत गिफ्ट; जानेवारीच्या अखेरीस येतेय जाहिरात 


स्थानिक यंत्रणा आणि प्रशासनानं दिलेल्या माहितीनुसार बुसान शहरातील एका विमानतळाच्या बांधकामाच्या ठिकाणी दौऱ्यादरम्यान त्यांच्यावर हा हल्ला करण्यात आला. प्रत्यक्षदर्शिंच्या माहितीनुसार हल्लेखोरानं त्यांच्यावर हल्ला करण्यासाठी चाकूसदृश्य धारदार वस्तूचा वापर करत हा हल्ला केला. कथित स्वरुपात गर्दीचा फायदा घेत हल्लोखोर सही मिळवण्यासाठीच्या बहाण्यानं पुढे आला आणि अचानकच त्यानं हे कृत्य केलं. 


कोण आहेत हे विरोधी पक्षनेते? 


दक्षिण कोरियातील Lee jae myung हे Democratic Party चं नेतृत्त्वं करत असून, त्यांचं वय 59 वर्षे असल्याचं सांगण्यात येत आहे. सध्या ते दक्षिण कोरियातील सक्रीय नेत्यांच्या यादीत कोणत्याही भूमिकेत नसले तरीही आगामी निवडणुकांसाठी ते महत्त्वाच्या जागेसाठी निवडणूक लढवणार असल्याचं सांगण्यात येत आहे. 2024 च्या एप्रिल महिन्यात या निवडणुका पार पडणार आहेत. 



ली 2022 मधील राष्ट्रपती निवडणुकीतही सहभागी झाले होते. इथं ते विद्यमान राष्ट्रपती  यूं सुक-योल यांच्यासोबतच्या लढतीमध्ये 0.73 मतांनी पराभूत झाले होते. 2027 च्या राष्ट्रपती निवडणुकीसाठीही ते उमेदवारी मिळवणार असल्याचं सांगितलं जात आहे.