न्यूयॉर्क : एखाद्याला प्रमाणापेक्षा जास्त ऑनलाईन ट्रोल करणं किती महागात पडू शकतं हे उत्तम उदाहरण आहे. हे उत्तम उदाहरण म्हणजे प्रसिद्ध पॉर्नस्टार अगस्ट एम्सचा मृत्यू. २३ वर्षीय पॉर्न स्टार एम्सने एक असं फोटोशूट करण्यास नकार दिला होता, ज्यातील मेल अ‍ॅक्टरने याआधी एका गे पॉर्नमध्ये काम केलं होतं.


डिप्रेशनमध्ये येऊन आत्महत्या


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अगस्टने या फोटोशूटला नकार दिल्यानंतर तिला सोशल मीडिया अतिशय वाईटपणे ट्रोल करण्यात आलं. तिला समलैंगिक विरोधी असंही म्हणण्यात आलं. मीडिया रिपोर्टनुसार, याच गोष्टीमुळे ती डिप्रेशनमध्ये आली होती आणि ५-६ डिसेंबरच्या रात्री तिने गळफास घेऊन आत्महत्या केली. 


२७० अ‍ॅडल्ट सिनेमांमध्ये काम


अगस्टने साधारण २७० अ‍ॅडल्ट सिनेमांमध्ये काम केलं होतं आणि तिला दोनदा बेस्ट परफॉर्मर अवॉर्डही मिळाला होता. तिच्या या अचानक निर्णयाने तिच्या मित्रांना चांगलाच धक्का बसला आहे. अनेकांना ती या जगात नसल्याचा विश्वासही होत नाहीये.


अगस्टचा माफी मागण्यास नकार


अगस्टने अनेकदा ट्विट करून सांगितले की, तिला कुणाच्या समलैंगिक असण्यावर काहीच अडचण नाही. ही केवळ तिची खाजगी निवड आहे की, कुणासोबत काम करावं आणि कुणासोबत नाही. अगस्ट तिच्या या निर्णयावर कोणत्याही प्रकारची माफी मागण्यास नकार दिला होता. 


मित्रांकडून तिच्यावर टीका


समलैंगिक सिनेमात काम केलेल्या अ‍ॅक्टरसोबत काम करण्यास नकार दिल्याने तिला तिच्या सहकारी पॉर्न स्टार्सनी सुनावले होते. त्यामुळे असे मानले जात आहे की, अगस्ट डिप्रेशनमध्ये गेली होती आणि शेवटी याला कंटाळून तिने आत्महत्या केली.