मुंबई : निवडणुकीच्या रिंगणात बरेच असे उमेदवार असतात, ज्यांच्या शिक्षणापासून त्यांच्या कामाचीही बरीच चर्चा होते. अशीच चर्चा सध्या एका अशा उमेदवाराची होत आहे, जिच्या वक्तव्यानं सर्वत्र खळबळ माजली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुळची पॉर्नस्टार असणारी ही उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्यामुळे सर्वांच्या नजरा तिच्याकडे वळल्या आहेत. ख्रिश्चन लेबर पार्टी या पक्षाकडून ही अडल्ट स्टार निवडणुकीच्या रिंगणात उतरु इच्छिते. (Porn Star Bianca Naldy to become a candidate in brazil election read details)


बियांका नाल्दी (Bianca Naldy) असं या अडल्ट स्टारचं नाव. आपण काय काम करतो हे ती कोणापासूनच लपवू इच्छित नाही. किंबहुना ख्रिस्त धर्मीय मतदारांना आपल्या या कामाची काहीच अडचण नसल्याचंही ती सांगते. 


पॉर्न फिल्ममध्ये काम करत असल्यामुळं बियांकावर टीकेची झोडही उठवण्यात आली आहे. पण, हे ईश्वरानंच दिलेलं एक पवित्र काम असल्याचं ती म्हणते. 'या सर्व गोष्टी ईश्वररचित आहे. सेक्स/ शरीरसंबंध प्रत्येकजण ठेवतं. फरक इतकाच की मी हे कॅमेऱ्याच्या समोर करते', असं ती म्हणते. 


आपल्यावर टीका करणारे लोक पाखंडी असल्याचं म्हणत तिनं पॉर्न फिल्ममध्ये काम करण्यात वावगं काहीच नाही, असंही म्हटलं आहे. एका मुलाखतीदरम्यान बियांकानं तिचे विचार सर्वांसमोर ठेवले. या क्षेत्रात येण्यापूर्वी ती नर्स टेक्निशियन म्हणून काम पाहत होती. राजकारणात येणं हे तिचं स्वप्न आहे. 



सध्या ब्राझीलमध्ये महागाईचा आगडोंब माजला आहे. हबी परिस्थिती पाहता आपण देशातील बेरोजगारी, महागाई, शिक्षण अशा अनेक मुद्द्यांसाठी काम करु इच्छितो असंही तिनं स्पष्ट केलं.