पॉर्नस्टारला मेसेज पाठवून १२ वर्षीय मुलाने केली `तशी` मागणी, तिने दिलं हे उत्तर
एका 12 वर्षांच्या मुलाने पॉर्न व्हिडिओ पाहून एका पॉर्नस्टारला मेसेज पाठवला आणि तिच्याशी सेक्स करण्याची इच्छा व्यक्त केल्याचा धक्कादायक प्रकार पॅरीसमध्ये घडला आहे.
पॅरिस : एका 12 वर्षांच्या मुलाने पॉर्न व्हिडिओ पाहून एका पॉर्नस्टारला मेसेज पाठवला आणि तिच्याशी सेक्स करण्याची इच्छा व्यक्त केल्याचा धक्कादायक प्रकार पॅरीसमध्ये घडला आहे. मुलाच्या हातात चुकून पॉर्नोग्राफी व्हिडिओ पडला आणि त्याला या व्हिडिओ पाहण्याचे व्यसन लागले. त्यातून हा प्रकार घडल्याचे म्हटले जात आहे.
28 वर्षांच्या निकिता बलुची नामक पॉर्नस्टारने हा घडलेला प्रकार एका ट्विटद्वारे जगासमोर आणला आहे. या ट्विटमध्ये तिने एका लहान मुलाने मेसेज पाठवून आपल्याशी सेक्स करण्याची इच्छा व्यक्त केल्याचे म्हटले आहे. तसेच मुलाला पॉर्नोग्राफीपासून दूर न ठेवल्याने त्या मुलाचा आई-वडिलांना दोषी ठरवले आहे. तसेच त्यांची कानउघडणीही केली आहे.
पॉर्नस्टार निकिता बलुची हिचे ट्विटरवर 1 लाख 60 हजार फॉलोअर्स आहेत. यापैकी चार अल्पवयीन मुलांच्या मेसेजचे फोटो निकिता हिने ट्विट केले आहेत. त्या मेसेजमध्ये ही मुले या पॉर्नस्टारजवळ सेक्सची मागणी करत आहेत.
त्यापैकी एका मुलाने निकिताला केलेल्या मेसेजमध्ये लिहिले आहे की, " हाय, मी आता 13 वर्षांचा होणार आहे. मी तुमचा चाहता आहे. तू माझ्यासोबत सेक्स करशील का?" या मेसेजला निकितानेही उत्तर दिले आहे.
ती या मुलाला पाठवलेल्या मेसेजमध्ये म्हणते," अरे 13 वर्षांच्या मुला, तू तुझा अभ्यास कर, यापुढे मला असे मेसेज पुन्हा पाठवत जाऊ नकोस. चुकून जर पुन्हा मेसेज पाठवलास तर मी त्या मेसेजचा स्क्रीनशॉट तुझ्या आईवडिलांना पाठवेन. निकिताची ही पोस्ट 14 हजारहून अधिक जणांनी लाईक केली आहे.
निकिता आपल्या मेसेजमध्ये म्हणते की, पॉर्नोग्राफीचा कंटेट मिळवणे आणि पाहणे सोपे झाले आहे. दुर्दैवाने यावर नियंत्रण नाही. त्यामुळे आजकाल अशा मुलांचे मेसेज मिळणे सामान्य झाले आहे.