वॉशिंग्टन : मोबाईल बनविणारी टॉपची कंपनी Appleला कर्मचाऱ्यांमुळे मोठा फटका बसला आहे. Apple च्या दुरुस्ती विभागाच्या काही कर्मचार्‍यांनी (Repair Department) एका विद्यार्थिनीची न्यूड फोटो फेसबुकवर पोस्ट केले होते, त्यानंतर मोठा गोंधळ निर्माण झाला. आता कंपनीने नुकसानभरपाई म्हणून पीडिताला लाखो रुपये देण्याचे मान्य केले आहे. कंपनीने दोषी कर्मचार्‍यांवरही कारवाई केली आहे. तसेच भविष्यात अशा घटना घडणार नाहीत, असेही आश्वासन दिले आहे.


2006 मध्ये घटना घडली


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'द टेलीग्राफ'च्या वृत्तानुसार, ओरेगॉनमधील (Oregon) 21 वर्षीय विद्यार्थिनीने Appleला 2016 मध्ये तिचा मोबाइल दुरुस्त करण्यासाठी दिला. हा मोबाइल कॅलिफोर्नियामध्ये (California) असलेल्या Appleच्या दुरुस्ती विभागात देण्यात आला होता. परंतु येथे काम करणाऱ्या दोन कर्मचार्‍यांनी मोबाईल फोन दुरुस्त करण्याच्या दरम्यान विद्यार्थिनीची सुमारे 10 छायाचित्रे तिच्या मोबाइलवरून तिच्या फेसबुक अकाउंटवर पोस्ट केली.


अशा प्रकारे हा प्रकार उघडकीस आला


अपलोड केलेल्या फोटोंमध्ये काही अतिशय वैयक्तिक फोटो देखील होते. आरोपीने अशा प्रकारे हा गुन्हा घडवून आणला की, मुलगीनेच स्वत: ही छायाचित्रे पोस्ट केली असल्याचे दिसून आले. विद्यार्थ्याच्या काही मित्रांनी तिला याबद्दल सांगितले तेव्हा हे प्रकरण उघडकीस आले. यानंतर पीडितेने त्वरित तिचा फोटो हटविला आणि कंपनीविरूद्ध कायदेशीर कारवाईचा बडगा उगारला.


दोन कर्मचार्‍यांना नोकरीतून काढून टाकले


आपली झालेली बदनामी आणि न्यायालयाने फटकारल्यानंतर Appleने आता नुकसान भरपाई देण्यास सहमती दर्शविली आहे. पीडित विद्यार्थ्याला लाखो डॉलर्सची नुकसान भरपाई दिली जाईल. तथापि, नुकसानीचे प्रमाण अद्याप सांगण्यात आले नाही. परंतु पीडितेच्या वकिलांनी मानसिक ताणतणावापोटी 5 मिलियन डॉलरची मागणी केली होती. मिळालेल्या माहितीनुसार कंपनीने या संदर्भात कारवाई करताना आपल्या दोन कर्मचार्‍यांना काढून टाकले आहे.