मुंबई : एका गर्भवती महिलेने थकवा जाणवत असल्याने दोन आठवडे कामावरुन सुट्टी घेतल्याने कंपनीने थेट या तिला कामावरुन काढून टाकलं. कामावरुन काढल्याच्या धक्का या महिलेला बसल्याने तिचा गर्भपात झाला. या महिलेने आपलं मुलं गमावलं. 
आता एका कामगार संघटनेने या कंपनीला महिलेच्या गर्भपतासाठी दोषी मानलं आहे. महिलेला कामावरुन काढल्यानंतर घडलेल्या प्रकारासाठी कंपनीला 65 हजार पाउंड एवढा दंड भरण्यास सांगितलं आहे. 65 हजार पाउंड म्हणजेच  66 लाख 57 हजार रुपयांचा दंड भरण्याचे आदेश देण्यात आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गरोदरपणामुळे सुरु झाला थकवा


 ब्रिटनमध्ये राहणाऱ्या Maya Geogiev या महिलेने जुलै 2018 मध्ये  Personal Insolvency Company येथे काम करायला सुरुवात केली होती. काम करत असताना एका दिवशी सकाळी उठल्यावर अचानक तिला थकवा जाणवायला सुरुवात झाली. काही वेळानंतर आपण प्रेग्नेंट असल्याचं तिच्या लक्षात आलं. त्यानंतर तिने ऑफिसला जाणं बंद करत वर्क फ्रॉम होम सुरु केलं. 


 कंपनीने महिलेला कामावरुन काढून टाकलं 


Maya Geogiev हिला जेव्हा आपण गरोदर असल्याचं कळलं, तेव्हा ती प्रोबेशन पीरियड वर होती. तिने आपण प्रेग्नेंट असल्याची माहिती सहकाऱ्यांना दिली होती. आणि त्यांना ही गोष्ट इतरांना न सांगण्याची विनंती केली होती. कारण तिला भीती होती की त्यामुळे तिचा जॉब जाऊ शकतो. काही दिवसांनंतर महिलेने आपण गरोदर असल्याचं कंपनीच्या एचआरला सांगितलं. प्रोबेशन पीरिएड पुर्ण होण्याच्या शेवटच्या दिवशी गरोदर महिला कामावर परतली. तिने आपण गरोदर असल्याचं कंपनी मिटींगमध्ये सांगितलं, तेव्हा मॅनेजरने आम्ही आजारी असलेल्या कर्माचाऱ्याला कामावर ठेऊ शकत नसल्याचं सांगत महिलेला कंपनीतून काढून टाकलं.


 महिलेचा दुसऱ्यांदा गर्भपात 


Maya Geogiev ने अर्ज मागे घेण्याची मागणी कंपनीला केली. मात्र कंपनीने अखेर तिला कामावरुन काढून टाकलं. फक्त प्रेग्नेंट असल्याने कामावरुन काढण्यात आल्याने या महिलेला त्याचा जबर धक्का बसला. कंपनीला विनंती करुनही या महिलेला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. याचा परिणाम अखेर महिलेचा दुसऱ्यांदा गर्भपात झाला.


कामगार संघटनेने उचललं कंपनीविरोधात पाऊल


कामगार संघटनेने कंपनीविरोधात पाऊल उचलत  65 हजार पाउंड म्हणजेच  66 लाख 57 हजार रुपयांचा दंड भरण्याचे आदेश दिले आहेत. ही रक्कम Maya Geogiev ला देण्यात यावी असं सांगण्यात आलं आहे.