भारतासोबत भागीदारीचा अभिमान, पाहा मोदींसोबत बैठकीनंतर काय म्हणाले CEO?
पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. वॉशिंग्टन डीसीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाच कंपन्यांच्या सीईओंशी बैठक घेतली.
वॉशिंग्टन : पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. वॉशिंग्टन डीसीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी क्वालकॉम, अॅडोबसह पाच कंपन्यांच्या सीईओंशी बैठक घेतली. या दरम्यान भारतातील भविष्यातील गुंतवणुकीसह विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यानंतर, पीएम मोदी अनेक देशांच्या नेत्यांसोबत बैठकही घेतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी रात्री उशिरा (भारतीय वेळेनुसार) ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांच्यासोबत बैठक करतील. यानंतर मोदी अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांच्याशी द्विपक्षीय बैठकही करतील. जपानचे पंतप्रधान योशिहिदे सुगा आणि पीएम मोदी यांच्यात देखील विविध विषयांवर चर्चा होणार आहे.
ब्लॅकस्टोन ग्रुपचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्टीफन म्हणाले की, "हे बाहेरच्या लोकांसाठी अतिशय अनुकूल सरकार आहे. ते सुधारणाभिमुख आणि हेतुपूर्ण आहेत.
वॉशिंग्टन डीसीमध्ये पीएम मोदींची भेट घेतल्यानंतर जनरल अटॉमिक्सचे सीईओ विवेक लाल म्हणाले, "ही एक उत्कृष्ट बैठक होती. भारतात गुंतवणूक आणि तंत्रज्ञानावरील विश्वास आणि धोरणात्मक सुधारणांच्या दृष्टीने भारतात येणाऱ्या अफाट क्षमतेबद्दल आम्ही चर्चा केली.'
पीएम मोदींशी भेटल्यानंतर क्वालकॉमचे सीईओ क्रिस्टियानो म्हणाले की, 'भारतासोबतच्या आमच्या भागीदारीचा आम्हाला खूप अभिमान आहे. आम्ही भारतासह जे काही करत आहोत त्यात आम्ही आनंदी आहोत.'
पंतप्रधान मोदींनी भारताच्या अक्षय ऊर्जेच्या मुद्यावर फर्स्ट सोलरचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क विडमार यांच्याशी चर्चा केली. या दरम्यान, सीईओ मार्कने सौर ऊर्जेबाबत काही योजनाही शेअर केल्या.
परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, भारतात चालू असलेल्या क्रियाकलाप आणि भविष्यातील गुंतवणूकीच्या योजनांवर पंतप्रधान मोदी आणि Adobe चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यात चर्चा झाली. आरोग्य, शिक्षण आणि संशोधन आणि विकास यासारख्या क्षेत्रांमध्ये डिजिटल इंडियाच्या प्रमुख कार्यक्रमाचा लाभ घेण्याच्या कल्पनांवरही चर्चा झाली.
पीएम मोदींशी संभाषणानंतर क्वालकॉमचे सीईओ म्हणाले, "त्यांनी (पीएम मोदी) भारतातील अविश्वसनीय संधींबद्दल सांगितले. भारत एक मोठी बाजारपेठ आहे, पण भारताकडे आपण एक मोठी निर्यात बाजार म्हणूनही पाहतो. भारतासाठी केवळ भारतीय बाजारपेठेसाठी उत्पादनच नव्हे तर इतर देशांच्या गरजा पूर्ण करण्याची योजना आखण्याची ही योग्य वेळ आहे. ”सीईओ आमोन यांनी सेमीकंडक्टर क्षेत्रात काम करण्यासाठी भारतासोबत भागीदारी करण्यास स्वारस्य व्यक्त केले. यासह, पीएम मोदींनी क्वालकॉमला आश्वासन दिले की भारत त्यांच्याद्वारे देण्यात आलेल्या प्रस्तावांवर सक्रियपणे काम करेल.
तीन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अॅडोबचे अध्यक्ष शंतनू नारायण यांची भेट घेतली. पंतप्रधान मोदी एकूण पाच कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबत बैठक करणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि क्वालकॉमचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. पंतप्रधान मोदींनी भारताने दिलेल्या मोठ्या संधींची माहिती दिली. त्याचबरोबर सीईओ आमोन यांनी भारतासोबत 5G आणि इतर क्षेत्रात काम करण्याची इच्छा व्यक्त केली.