नवी दिल्ली : अर्जेंटिनामध्ये उद्यापासून होऊ घातलेल्या जी २० परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्युनोस आयर्स इथं दाखल झालेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह जगातल्या अन्य १९ राष्ट्रप्रमुखांच्या या परिषदेमध्ये पुढल्या दशकभरात जगासमोर असेलल्या आव्हानांवर चर्चा होणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या परिषदेच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प आणि जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांच्यासह त्रिपक्षीय बैठकीतही पंतप्रधान मोदी सहभागी होणार आहेत. इंडो-पॅसिफिक क्षेत्रामध्ये चीनच्या वाढत्या प्रभावावर विचार करण्यासाठी अमेरिका आणि जपानची पूर्वीपासूनच चर्चा सुरू आहे.


आता यात भारतही सहभागी होणार असून अर्जेंटिनामध्ये होणारी बैठक ही यापुढल्या त्रिपक्षीय सहकार्याच्या दिशेनं पहिलं पाऊल ठरणार आहे. त्यासाठी मोदींचा हा दौरा महत्वाचा मानला जात आहे.