मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अनेक जागतिक नेत्यांना मागे टाकत रेटिंगमध्ये अव्वल स्थान मिळवले आहे. मोदींनी मागे सोडलेल्या नेत्यांमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन, ब्रिटीश पंतप्रधान बोरिस जॉन्सन, जर्मन चान्सलर अँजेला मर्केल, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो आणि अनेक दिग्गज नेत्यांचा समावेश आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'सर्व प्रौढांमध्ये' केलेल्या सर्वेक्षणानुसार, पीएम मोदींना 70 टक्के लोकांनी रेटींग दिलं आहे. त्यानंतर मेक्सिकोचे अध्यक्ष अँड्रेस मॅन्युएल लोपेझ ओब्राडोर 64 टक्के आणि इटलीचे पंतप्रधान मारिओ ड्रॅगी 63 टक्के रेटींगसह तिसऱ्या स्थानावर आहेत.


जागतिक नेत्यांचे रेटिंग


नरेंद्र मोदी- 70%


लोपेझ ओब्राडोर - 64%


द्रघी - 63%


मर्केल - 52%


बायडेन - 48%


मॉरिसन - 48%


ट्रुडो - 45%


जॉन्सन - 41%


बोलसोनारो - 39%


मून - 38%


सांचेझ - 35%


मॅक्रो - 34%


सुगा - 25%


यूएस डेटा इंटेलिजन्स फर्म मॉर्निंग कन्सल्टने ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, भारत, इटली, जपान, मेक्सिको, दक्षिण कोरिया, स्पेन, युनायटेड किंगडम आणि युनायटेड स्टेट्स मधील शीर्ष नेत्यांसाठी मान्यता रेटिंगचा मागोवा घेतला आहे. संस्थेच्या मते, त्याचे रेटिंग प्रत्येक देशातील प्रौढ रहिवाशांच्या सात दिवसांच्या बदलत्या सरासरीवर आधारित आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जगातील प्रत्येक नेत्याला मागे टाकले आहे.