नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा इस्राईल दौरा आजपासून सुरु होत आहे. इस्राईल दौऱ्यावर जाणारे मोदी हे पहिले भारतीय पंतप्रधान असतील. पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी तिथे जय्यत तयारी करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा ऐतिहासिक दौरा ठरणार आहे. मोदींच्या स्वागतासाठी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामीन नेतन्याहू प्रोटोकॉल तोडून विमानतळावर पोहोचणार आहेत. इस्राईलच्या दौ-यात पंतप्रधान मोदींना सरप्राइज मिळणार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंतप्रधान मोदींनी देखील याला विशेष दौरा म्हटलं आहे. दहशतवादाच्या मुद्दयावर दोन्ही देशांचं सारखंच मत आहे. 9 सप्टेंबर 2003 रोजी इस्रायलचे तत्कालीन पंतप्रधान एरिक शेरॉन भारत दौऱ्यावर आले होते. त्यावेळी भारताचे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी त्यांचं स्वागत केलं होतं.


इस्राईलच्या पंतप्रधान कार्यालयाने जारी केलेल्या एका व्हिडिओनुसार नेतन्याहू यांनी येथे उपस्थित लोकांना हिब्रूमध्ये संबोधीत करतांना म्हटलं की, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगातील सर्वात महत्वाच्या पंतप्रधानांपैकी एक आहेत. भारत हा जगातील अत्यंत वेगाने वाढणारा तिसरा सर्वात मोठी अर्थव्यवस्था असणारा देश आहे. ते पाणी, कृषी, आरोग्य आणि सायबर सारख्या अनेक क्षेत्रांमध्ये इस्राईल सोबत जवळचे संबंध बांधू इच्छितात. आणि असं करण्यासाठी त्यांच्याकडे एक मोठं कारण पण आहे. भारत आणि इस्राईल यांच्यातील राजनैतिक संबंधांना 25 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे पंतप्रधान मोदी चार जुलैला इस्राईलच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर येत आहेत.