टोरंटो : कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण जगातील देश चीन विरोधात संताप व्यक्त करत आहेत. जे देश आतापर्यंत चीन विरोधात कधी बोलत नव्हते. ते देश देखील आता उघडपणे चीनला विरोध करत आहेत. वेगवेगळ्या कारणांमुळे जगभरातील अनेक देश चीनच्या विरोधात आवाज उठवत आहेत. कॅनडाच्या टोरंटो शहरात सोमवारी भारतीय समुदायाच्या लोकांनी चीनविरोधात निदर्शनं केली. यावेळी अनेक देशांचे लोकं देखील आपल्या देशाचा झेंडा घेऊन या निदर्शनात सहभागी झाले होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कॅनडाच्या टोरंटोमध्ये चिनी दुतावासाबाहेर कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायनाच्या विरोधात निदर्शनं करण्यात आली. टोरंटोमधील स्थानीय लोकं, इराण, तिबेट आणि व्हियतनामये नागरिक देखील यावेळी भारतासोबत सहभागी झाले होते.


सीमा वादात २० भारतीय जवान शहीद झाल्यानंतर भारताने चीनविरोधात वेगवेगळ्या निर्णयातून धडा शिकवण्याचा प्रयत्न केला आहे. चीन विरोधात इतर देश ही आक्रमक झाले आहेत. चिनी ऐप पासून वस्तूंपर्यंत बहिष्कार करण्याची मागणी होऊ लागली आहे.



याआधी ऑस्ट्रेलिया, ब्रिटेन आणि अमेरिकेत भारतीय समुदायाच्या लोकांनी चीनच्या विरोधात निदर्शनं केली आहेत. फक्त भारतच नाही तर अनेक देशांसोबत चीन वाद घालण्याचा प्रयत्न करत आहे. इराण-चीन मध्ये झालेल्या डीलचा देखील अनेक जण विरोध करत आहे. त्यामुळे इराणी लोकं देखील यावेळी सहभागी झाली होती.


व्हियतनाम आणि चीनमधील वाद जुना आहे. कॅनडा यावेळी कोरोनामुळे संतप्त आहे. तर अनेक छोटे देश देखील आता चीन विरोधात उघडपणे विरोध करत आहेत.