Python attacked goat : इंटरनेटवर व्हायरल व्हिडिओंची भरमार ( Viral video) असते. यामध्ये प्राण्यांचे आणि विशेषकरून अजगराच्या व्हिडिओं प्रचंड व्हायरल होत असतात. खरंतर अजगर हा प्रचंड शक्तिशाली सरपटणारा प्राणी. एकदा अजगराने घट्ट मिठी मारली, की त्यातून सुटणं प्रचंड कठीण. भल्यामोठ्या अजगराला पाहूनच अनेक जण त्याच्या जवळही जात नाही. अजगारासमोर माणसाची ताकदही कमी पडते. गेल्या काही दिवसांपूर्वी एका बलाढ्य अजगराने 54 वर्षीय महिलेला जिवंत गिळलं होतं. अशाच प्रकारे अगदी मगरीपासून कोणत्याही  प्राण्याचा अजगर गिळू शकतो. सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ ट्रेंडिंगमध्ये आहे आणि यामध्ये अजगराने बकरीला घट्ट पकडल्याचे ( Azgar Ka video)   पाहायला मिळते आहे. मात्र त्या बकरीचं नशीब बलवत्तर म्हणून काही मुलांनी तिचा बचाव केला आणि तिला अजगराच्या ( Goat rescued from Python Attack ) मिठीतुन सोडवलं.      


कुणी शेअर केला हा व्हिडीओ 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फेसबुकवरील Waje नामक एका अधिकृत अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ वाऱ्याच्या वेगाने इंटरनेटवर पसरला आणि आतापर्यंत ( बातमी लिहीत असेपर्यंत) तब्बल 80 मिलियन्स पेक्षा अधिकवेळ पहिला गेला आहे. या व्हिडिओवर तब्बल 12 हजारांपेक्षा अधिकांनी कमेंट्स केल्या आहेत. यावर साडे सात लाखांपेक्षा अधिक रिऍक्शन्स आल्या आहेत. यावर प्रतिक्रिया देणाऱ्यांनी हा ठरवून शूट केल्याचं बोललं आहे. तर काही जणांनी मुलांनी ज्या प्रकारे बकरीला वाचवलं ते अतिशय खतरनाक असल्याचं सांगितलं आहे. या मुलांनी स्वतःच्या जीवावर बेतून बकरीला वाचवलं, अनेकांनी या मुलांचं कौतुक केलं आहे.  


हेही पहा : Funny Thief: चोराचा चोरीदरम्यान विचित्र प्रकार! त्या रात्री असं घडलं की तुम्हीही पोट धरून हसाल


आधी तुम्ही हा व्हिडीओ पाहा



असा झाला हल्ला, असं झालं रेस्क्यू ऑपरेशन


फेसबुकवर शेअर करण्यात आलेली ही क्लिप 7.44 मिनिटांची आहे. यामध्ये आपण शेतात काही बकऱ्या पानं तोडून खाताना पाहायला ( Goats eating in farm)  मिळतात. तिथेच एक अजगर देखील पाहायला मिळते. अचानक हा अजगर तिथल्या एका बकरीवर हल्ला चढवतो. बकरीवर हल्ला चढवल्यानंतर अजगर बकरीवरील आपली पकड अधिक मजबूत करण्याचा प्रयन्त करतो. बकरीही स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करते. मात्र ती स्वतः सोडवू शकत नाही. एक वेळ अशी येते जेंव्हा ही बकरी मरेल की काय असं वाटतं. मात्र तेवढ्यात तिथे लहान मुलांची एक टोळी येते. या बकरीला अजगारापासून सोडवायचा या मुलांनी निश्चय केलेला पाहायला मिळतो.  ही मुलं तात्काळ या बकरीला सोडवण्याचे प्रयत्न सुरु करतात. ही मुलं आपल्या हातांनीच अजगराला पकडतात आणि त्याची बकरीवरील पकड कमी करण्याचा प्रयन्त करतात. शेवटी ही मुलं त्या बकरीला वाचवतात. या अजगराला ही मुलं आपल्यासोबत घेऊन जाताना पाहायला मिळतं. 


हेही वाचा : Optical Illusion: 'या' फोटोत लपलेले 13 प्राणी शोधून दाखवा, तुमच्याकडे 30 सेकंदाची वेळ


python attacked goat in the farm but small kids rescued goat video shared by waje official page