Qatar Strict Law: एकदोन नव्हे, तर भारताच्या तब्बल 8 माजी नौदल अधिकाऱ्यांना कतारमध्ये फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. हेरगिरीचा आरोप लावत एका देशाची गोपनीय माहिती दुसऱ्या देशापर्यंत पोहोचवण्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर लावण्यात आला आहे. यामध्येत भारतीय केंद्र शासनाकडूनही या प्रकरणात ताब्यात असणाऱ्या सैनिरांच्या सुटकेसाठी प्रयत्न करण्यात यावेत अशी विचारणा सातत्यानं केली जात आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कतारनं भारतीय संरक्षठण दलातील अधिकाऱ्यांना शिक्षा सुनावल्यानंतर या देशातील कायदे आणि तेथील नियमांची एकच चर्चा जगभरात पाहायला मिळाली. त्यातीलच एका नियमानं अनेकांचा थरकाप उडवला. मुळातच कतारमध्ये कठोर शासन आणि नियमांची किंवा क्रूर शिक्षेची ही पहिलीच वेळ नाही. इथं पॉर्न, सेक्स अशा गोष्टींसाठीसुद्धा कठोर शिक्षा सुनावली जाते. आजही या भागांमध्ये काही गोष्टींबाबत कमालीचा न्यूनगंड पाहायला मिळतो. 


फुटबॉल विश्वचषकाच्या वेळी अजब निर्णयानं वळवल्या नजरा...


2022 मध्ये कतारनं फिफा फुटबॉल विश्वचषकाचं आयोजन केलं होतं. पण, ही स्पर्धा सुरु होण्याआधीच कतारनं असे काही नियम इथं लागू केले होते की, त्या नियमांमुळंच फिफा चर्चेचा विषय ठरलं होतं. यातील एक नियम होता One Night Stand संदर्भातला. 


कतारनं  One Night Stand साठी परवानगी नाकारत कोणतंही हॉटेल किंवा कोणत्याही रुमवर, फ्लॅटवर कोणीही One Night Stand (एका रात्रीसाठीची शारीरिक जवळीक)करताना आढळलं तर असं करणाऱ्या व्यक्तीला 7 वर्षांची शिक्षा सुनावण्याचा निर्णय़ कतारनं घेतला. इतकंच नव्हे तर, त्यावेळी फक्त पती आणि पत्नीलाच एका खोलीत राहण्याची मुभा देण्यात आली होती. कतारमधील नियम इतके कठोर आहेत की, अनेक अविवाहित जोडप्यांना हॉटेलमध्येही खोली देण्यात आली नव्हती. नियमांची यादी इथंच थांबली नाही, तर सामन्यांनंतरच्या पार्टीवरही कतारनं अनेक निर्बंध लावले होते. वेळप्रसंगी पार्टीलाही परवानगी नाकारली होती.  


हेसुद्धा वाचा : काय सांगता? इटलीत तीन महिन्यांपासून एकही बाळ जन्माला आलं नाही! धक्कादायक आहे कारण


हे नियम फक्त विश्वचषकापुरताच सीमित नसून, कतारमध्ये विवाहबाह्य प्रेमप्रकरण किंवा कोणतंही चुकीचं नातं बेकायदेशीर ठरवण्यात येतं. असं करणाऱ्यांना विचारही केला जाणार नाही अशी कठोर शिक्षा ठोठावण्यात येते. कतारमधील नियम इतके सक्तीचे आहेत की इथं प्रेम करणं म्हणजे जणू अपराध. प्रेम व्यक्त करणंही शिक्षेल पात्र. जगभरात कतार हा देश तेथील लांबलचक आणि सक्तीच्या नियमांमुळं चर्चेत असतो.