वॉशिंग्टन : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी पुन्हा एकदा राहुल गांधींना चर्चेत आणले आहे. तर भाजपला काँग्रेसच्या माजी अध्यक्षांवर टीका करण्याची मोठी संधी मिळाली आहे. ओबामा यांनी आपल्या 'ए प्रॉमिस्ड लँड' या पुस्तकामध्ये काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या व्यक्तिमत्त्वावर उघडपणे भाष्य केले आहे. अमेरिकेचे पहिले आफ्रिकन-अमेरिकन अध्यक्ष ओबामा यांनी 2010 आणि 2015 मध्ये आपल्या कार्यकाळात दोनदा भारताला भेट दिली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

न्यूयॉर्क टाईम्सने ओबामांच्या 'ए प्रॉमिस्ड लँड' या पुस्तकाचा आढावा घेतला आहे. यामध्ये माजी राष्ट्राध्यक्षांनी जगभरातील राजकीय नेत्यांव्यतिरिक्त इतर विषयांवरही भाष्य केले आहे. बराक ओबामा म्हणाले की, काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी हे भयभीत आणि नम्र विद्यार्थी आहेत. जे आपल्या शिक्षकाला प्रभावित करण्यासाठी उत्सूक आहेत. पण त्यांच्यात क्षमतेची उणीव आहे.'


ओबामांनी सोनिया गांधी यांचा उल्लेख देखील केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, 'चार्ली क्रिस्ट आणि रहम एमॅन्युएलसारख्या पुरुषांच्या आकर्षणाविषयी आपल्याला सांगितले जाते. पण महिलांच्या सौंदर्याचा उल्लेख केला जात नाही. फक्त एक-दोन अपवाद आहेत जसे की, सोनिया गांधीं. अमेरिकेचे माजी संरक्षण मंत्री बॉब गेट्स आणि भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग दोघांमध्ये निष्ठावंत प्रामाणिकपणा असल्याचे त्यांनी म्हटले आहे.


ओबामा यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचा बलवान आणि हुशार बॉस म्हणून वर्णन केले. 17 नोव्हेंबरला ओबामाचं यांचं हे पुस्तक बाजारात उपलब्ध होणार आहे.