मुंबई : सोशल मीडियावरती सध्या मंगळावरील इंद्रधनुष्याचे फोटो व्हायर होत आहेत. तो इंद्रधनुष्य खूप सुंदर दिसत आहे, अनेकांना अवकाश प्रेमींना तर असा प्रश्न पडला आहे की, पाऊस पडल्यामुळे सुर्याच्या किरणांमुळे इंद्रधनुष्य दिसतो. परंतु मंगळावरती तर पाऊसच पडत नाही मग हा इंद्रधनुष्य कसा तयार झाला?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नासा दरवेळी मंगळावरील शोधात कार्याट एक पाऊल पुढे आहे. सध्या ते या शोधात आहेत की, मंगळावरती पृथ्वी सारखे जीवन कसं बनवले जाऊ शकते?
अमेरिकेची अंतराळ संस्था नासाचा (NASA) पर्सिव्हेरन्स रोव्हर मंगळाच्या (Mars) पृष्ठभागावरून प्रत्येक संभाव्य फोटो पाठवत असते. नुकतेच हेलिकॉप्टर इनजीन्यूटीमधून (Ingenuity) रोव्हरचे विभाजन झाल्यानंतर फोटो समोर आले आहेत.


हे फोटो पाहून सोशल मीडिया यूझर्सना असं वाटलं की त्यात इंद्रधनुष्य (Rainbow)  दिसत आहे. परंतु प्रश्न असा आहे की, जर लाल ग्रहावर पाऊसच पडत नसेल तर हा इंद्रधनुष्य कसा तयार झाला?


इंद्रधनुष्य कसे बनले?


NASA च्या मंगळ प्रोग्रामध्ये काम करत असलेले मार्शल शेपर्ड (Marshall Shepard) आणि लॉकहीड मार्टिन कमर्शल सिव्हिल स्पेस ऍडव्हान्स प्रोग्राम्स ची चीफ टेक्नॉलजिस्ट लिसाच्या मते, मंगळावर पाऊस पडत नाही पण ध्रूवावर बर्फ नक्कीच सापडला आहे. मंगळावर वायुमंडळात पाण्याची वाफ आणि बर्फाने ढग बनतात. त्याचवेळी नासाच्या मुख्यालयातून डेव लॅवरी याने मार्शलला सांगितले की, ही इंद्रधनुष्य नाही. हे कॅमेरा लेन्समधील रिफ्लेक्शन आहे.



डेव लावरीच्या मते, इतर कोणत्याही कॅमेरा सिस्टममध्ये जसे लेन्स फ्लेअर असतो, अगदी तशाच प्रकारे येथे घडले आहे. त्याने सांगितले की, रोव्हर हेलिकॉप्टरच्या उत्तरेकडे आहे. तर जेव्हा हे फोटो घेतले गेले असेल, त्यावेळी कॅमेरा मंगळावर दुपारी अडीच वाजता दक्षिणेच्यादिशेने पाहात होता. अशा परिस्थितीत, कॅमेरामध्ये असे रिफ्लेक्शन येऊ शकते.