बॅंकॉक : पर्यटनाचे ठिकाण म्हणून थायलंड जगप्रसिद्ध. अवग्या दुनियेतील लोक येथे पर्यटनासाठी येतात. यात काही फॅमेली टूरवर येतात. काही ऑफिशिअली टूरवर तर काही, बँकॉक आणि थायलंडच्या झगमगाटी आणि तितक्याच रंगिल्या रात्रींची अनुभुती घेण्यासाठी. थायलंडमध्ये, बॅंकॉकमध्ये चालणाऱ्या रंगील्या रात्रींच्या दुनियेबाबत जगभरात सर्वांनाच माहिती आहे. पण, या रात्रींमध्ये किती जणींच्या आयुष्याचे सूर बेसूर होतात याची बहुतेकांना कल्पना नसते. थायलंडच्या पटाया आणि बँकॉकमध्ये चालणारे बीअरची मुक्त उधळण, बॉडी मसाज, जुगारखाने हे उद्योग आता पैसे केमावण्याचे प्रमुख अड्डे झाले आहेत.


वेश्याव्यवसाय बेकायदेशिर


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपल्यापैकी अनेकांना कल्पना नसेल की, थायलंडमध्ये शरीरविक्रय म्हणजेच वेश्याव्यवसाय हा कायद्याने बेकायदेशिर ठरवला आहे. पण, थायलंडमधल्या लाखो तरूणींनी हा व्यवसाय प्रमुख व्यवसाय म्हणून स्विकारला आहे. इंटरनेटवरील आकडेवारीनुसार, थायलंडमध्ये सुमारे १ लाख २३ हजार इतक्या वेश्या (सेक्स वर्कर) आहेत. कधी बॉडी मसाज, कधी बीयर वाटप करण्याच्या निमित्ताने या तरूणी धंद्याला चिटकून आहेत. थायलंडच्या नव्या पर्यटनमत्र्यांनी थायलंडमधील वेश्याव्यवसाय बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. पण, दुर्दैव असे की, हा व्यवसाय इथल्या मुलींसाठी अत्यंत आवश्यक ठरला आहे. आणि त्या या ना त्या बहाण्याने त्या तो करतातच. 


पैशाच्या हव्यासासाठी पर्यटकांच्या मनमानीची शिकार


थायलंडमध्ये हा व्यवसाय प्रामुख्याने बॉडी मसाज आणि बार गर्ल्सच्या आडून केला जातो. खास करून विदेशातून येणाऱ्या पर्यटकांमध्ये हा व्यवसाय अत्यंत लोकप्रिय आहे. काही मुली या व्यवसायात अत्यंत मजबूरीने येतात. काहींना फसवून या धंद्यात अडकवले जाते. थायलंडच्या रंगील्या रात्रींमध्ये असंख्य तरूणींची आयुष्य कुस्करली जातात. ज्याचा आवाजही येत नाही. या तरूणींची आयुष्य ही बँकॉक आमि पटायातील बीच आणि बअर बारमध्ये कैद होऊन गेली आहे. काही डॉलर्सच्या बदल्यात या तरूणी विदेशी पर्यटकांच्या मनमानीच्या शिकार होतात.