मुंबई : संपूर्ण जगाला संभ्रमात टाकणारे उत्तर कोरियाचे हुकूमशाह किम जोंग उन यांनी आपला सुरक्षारक्षक बदलला आहे. माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार किम जोंग यांनी आपल्या सुरक्षारक्षकासोबतच गुप्तचर प्रमुखांनाही हटवलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दक्षिण कोरियाच्या दैनिकाने दिलेल्या वृत्तानुसार लेफ्टनंट जनरल रिम क्वांग-ईल यांना मागच्या डिसेंबर महिन्यात किल-गीत यांच्याबदली टोही जनरल ब्युरोचे प्रमुख म्हणून पदोन्नती मिळाली होती. याशिवाय रिम यांना मागच्या वर्षी डिसेंबरमध्ये सत्तेत असलेल्या वर्कर्स पार्टीने केंद्रीय सैन्य आयोगाचा सदस्य म्हणूनही नियुक्त केलं होतं.


याशिवाय सुप्रीम गार्ड कमांडर हे पद मागच्या वर्षी एप्रिल महिन्यात क्वाक चांग-सिक यांना देण्यात आलं होतं. क्वाक चांग-सिक यांनी ऑक्टोजेरियन आर्मी जनरल यूं जोंग-रिन यांची जागा घेतली होती. क्वाक यांनाही डिसेंबर महिन्यात सत्तारूढ पक्षाने केंद्रीय समिती सदस्य म्हणून नियुक्त केलं होतं. 


सियोलच्या यूनिफिकेशन मिनिस्ट्रीने दिलेल्या माहितीनुसार २३ इतर सैन्य कर्मचारी, इतर पक्षाचे आणि सरकारी अधिकाऱ्यांमध्येही फेरबदल करण्यात आले आहेत. किम जोंग आपल्या मंत्रिमंडळात नव्या लोकांना संधी देणार असल्याचं बोललं जातंय. उत्तर कोरियामध्ये आपली पकड आणखी मजबूत करण्यासाठी किम जोंग यांनी हे पाऊल उचलल्याची चर्चा आहे. असं असलं तरी किम जोंग यांची छोटी बहिण किम यो-जोंग यांना कोणतं पद देण्यात येणार, याबाबत उत्तर कोरियाने माहिती दिली नाही. किम यो-जोंग यांच्याकडे किम जोंग उन यांची उत्तराधिकारी म्हणून पाहिलं जातंय.