इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा हेलिकॉप्टर क्रॅशमध्ये मृत्यू; घटनास्थळावरून मोठी माहिती समोर
Iran President Ebrahim Raisi Helicopter crash : अजरबैजानहून परतत असताना इराणच्या राष्ट्राध्यक्षांच्या हेलिकॉप्टरचा भीषण अपघात झाला. अपघाताची माहिती मिळाल्या क्षणापासून आतापर्यंच अद्याप त्यांची माहिती मिळू शकलेली नाही.
Iran President Ebrahim Raisi Helicopter crash : इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्या हेलिकॉप्टरचा भीषण अपघात झाला आणि या अपघातानं संपूर्ण जगाच्या नजरा वळवल्या. अजरबैजान इथून परतत असताना रायसी यांचं हेलिकॉप्टर क्रॅश झालं. रायसी यांच्या ताफ्यामध्ये एकूण तीन हेलिकॉप्टर प्रवास करत होते. या भीषण अपघातातून दोन हेलिकॉप्टर सुरक्षित परतले, पण ज्यामधून रायसी, इराणचे परराष्ट्र मंत्री हुसैन अमीर अब्दुल्लाहियन आणि अजर्बैजानचे माजी गव्हर्नर मालेक रहमती यांच्यासह धार्मिक नेते मोहम्मद अली आले-हाशेम प्रवास करत होते त्याच हेलिकॉप्टरला हा अपघात झाला. तेहरानपासून जवळपास 600 किमी अंतरावर उत्तर पश्चिमेला अजरबैजानच्या सीमाभागात ही भयंकर दुर्घटना घडली. ज्यानंतर या अपघातात कोणीही हयात असल्याची शक्यता अतिशय कमीच असल्याची धक्कादायक माहिती घटनास्थळावरून समोर आली आहे.
इराणी रेड क्रिसेंट सोसायटी (आईआरसीएस) च्या अध्यांनी या शक्यतेला दुजोरा दिला असून, घटनास्थळी अपघातग्रस्त हेलिकॉप्टरची ओळख पटवण्यात आली आहे. दुर्घटनेच्या जवळपास 17 तासांनंतर बचाव पथक घटनास्थळी दाखल झालं पण, खराब हवामानामुळं इथं बचावकार्यात अनेक अडथळे निर्माण होताना दिसले. रविवारी भारतीय प्रमाण वेळेनुसार साधारण दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. ज्यानंतर आता या भागात शोधमोहिम हाती घेण्यात आली असून, जवळपास 40 पथकं रईसी आणि हेलिकॉप्टरमधून प्रवास करणाऱ्या इतरांचा शोध होत्या.
बचाव पथकं घटनास्थळी दाखल झाली त्यावेळी तिथं पाऊस, धुकं आणि बर्फाच्या वादळामुळं आव्हानात्मक परिस्थिती निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं. तेहरान टाईम्सटच्या माहितीनुसार सध्या 40 पथकं या पर्वतीय क्षेत्रामध्ये शोधमोहिमतेस सहभागी असून, अद्याप इथं हवामान खराब असल्यामुळं हवाई पथकं शोधमोहिमेत योगदान देण्यास असमर्थ असल्यानं बचाव मोहिमेत अनेक आव्हानं उभी राहताना दिसत आहेत. त्यात या भागात पक्के रस्ते नसल्यामुळं आणि प्रचंड चिखल असल्यामुळं शोधमोहिमेत प्रचंड अडचणी निर्माण होताना दिसल्या.
हेसुद्धा वाचा : VOTERS' ID नसेल तर 'ही' 12 ओळखपत्र दाखवून करता येईल मतदान
दरम्यान, संपूर्ण इराणमध्ये सध्या रईसी यांच्या प्रकृतीविषयी चिंता व्यक्त केली जात आहे. इराण आणि अजरबैजानमधील नात्यांमध्ये सुधारणा आणण्याच्या हेतूनं रईसी तिथं पोहोचलले होते. अद्यापही रायसी यांच्या हेलिकॉप्टरचा अपघात कसा झाला याची माहिती समोर येऊ शकलेली नाही. इराणमधील स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार हवामानातील बदलांमुळं हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे.