Coronavirus : कोरोना व्हायरसने पुन्हा एकदा जगाचे टेन्शन वाढवले आहे. चीनमध्ये कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने (New Varient) थैमान घातले आहे. कोरोनामुळे मृतांचा आकडा वाढत असून चीनमध्ये भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर भारत सरकार (Indian Government) अलर्ट मोडवर आलं आहे. यासाठीच कोरोनाला रोखण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (Health ministry) सुधारित गाईडलाईन्स (Coronavirus Guideline) जारी केल्या आहेत. त्यातच आता कोरोना व्हायरस बाबत धडकी भरवणारे संशोधन समोर आले आहे. कोरोनाचा विषाणू आठ महिने शरीरात राहतो असा दावा या नवीन संशोधनात करण्यात आला आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या नवीन संशोधानामुळे चिंता वाढली असून अधिक काळजी घेण्याची गरज आहे. कोरोनातून बरे झाला असला तरी लगेचच कोरोनामुक्त होत नाहीत अशी धक्कादायक माहिती संशोधनातून समोर आली आहे. कोरोनाचा विषाणू जवळपास आठ महिने कोराना झालेल्या व्यक्तीच्या शरीरात राहतो असं निष्कर्ष अमेरिकेच्या संशोधकांनी काढला आहे. 


कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या मृतदेहांचे संशोधन करण्यात आले. या संशोधनाअंतर्गत पोस्ट मॉर्टेममधून मतृदेहांच्या टिश्यूंच्या नमुन्यांचा अभ्यास करण्यात आला. अमेरिकेच्या यूएस नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ हेल्थ या वैद्यकीय संस्थेच्या संशोधकांनी हे संशोधन केले आहे. कोरोना होऊन गेल्यानंतरही जवळपास तब्बल आठ महिने  कोरोनाचा विषाणू मानवी शरीरात राहत असल्याची धक्कादाय माहिती समोर आली आहे. 


कोरोनाचा XBB.1.5 व्हेरिएंट सध्या वेगाने पसरत आहे. BQ1 पेक्षा 120 टक्के वेगाने याचा फैलाव होत आहे. XBB.1.5 हा व्हेरिएंट XBB आणि BQ पेक्षा शरीराच्या प्रतिकारशक्तीपासून बाहेर पडण्यास सक्षम आहे. XBB.1.5 प्रकाराचा संसर्ग दर खूप जास्त आहे.  


कोरोनाने थैमान घातलेलं असतानाच  सुपरबगचा धोका


सर्वत्र कोरोना(corona)ने थैमान घातलेलं असतानाच आता  सुपरबगमुळे(Superbugs) मृत्यूचं तांडव होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सुपरबग हा जीवाणू, विषाणू, पॅरासाईटचा एक स्ट्रेन आहे. अँटिबायोटिकच्या गैरवापर तसेच याच्या अतीवापरामुळे सुपरबग तयार होतो. सुपरबग बनल्यानंतर याचा संसर्ग कोणत्याही औषधांनी मरत नाही. जखम, लाळ, लैंगिक संबंध, त्वचेच्या संपर्कातून सुपरबग पसरतो. सुपरबग इतर रोगांपेक्षा लोकांमध्ये वेगाने पसरत असल्याचे चिंता वाढली आहे. या सुपरबगवर कोणत्याही औषधाचा परिणाम होत नाही. 


भारत सरकारची नियमावली


चीन, जपान, दक्षिण कोरिया, हॉंगकॉंग तसंच थायलंड या ठिकाणहून येणाऱ्या प्रवाशांसाठी 72 तासांपूर्वी करण्यात आलेली RTPCR टेस्ट रिपोर्ट अपलोड करणं बंधनकार करण्यात आली आहे. Transiting प्रवाशांसाठी देखील हे अनिवार्य असून, भारतात आल्यानंतर पुन्हा त्यांची टेस्ट होणार असल्याचे केंद्र सरकारने जाहीर केलेल्या मार्गदर्शन नियमावलीत नमूद करण्यात आले आहे.