Banana Fruit :  केळी हे फळ आरोग्यवर्धक फळ आहे. केळी मध्ये मोठ्या प्रमाणात जीवनसत्वे असतात.  केळी अतिशय स्वस्त असल्यामुळे सर्वांना परवडणारे असे हे फळ आहे. यामुळेच भारतासह जगभरातील अनेक देशांमध्ये केळी हे फळ मोठ्या प्रमाणात खाल्ले जाते. मात्र, केळी हे फळ जगातून गायब होणार आहे. संशोधकांनी हा इशारा दिला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वर्ल्ड बनाना फोरम च्या संशोधकांनी केळी या फळाबाबत संशोधन केले आहे. केळी फळाबाबत संशोधन करणारे संशोधक  पास्कल लियू यांनी केळी हे फळ हे जगातून हद्दपार होणार असल्याचा इशारा दिला आहे. बदलत्या हवामानाचा जबरदस्त फटका केळी पिकाला बसला असून केळी हे पीक धोक्यात आल्याचा इशारा संशोधकांनी दिला आहे. 


आजइंग्लिश डॉट टीवी ने याबाबतचे वृत्त दिले आहे. विविध प्रकारची फळे तसेच पिकांसंदर्भात संशोधन तसेच आव्हाने याबाबत चर्चा करण्यासाठी मंगळवारी इटलीतील रोम येथे   वर्ल्ड बनाना फोरमची बैठक पार पडली. केळी हे जगभरात मोठ्या प्रमाणात निर्यात केले जाणारे फळ आहे. मात्र, मागील काही महिन्यांत केळी या फळाच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. परिणामी जगभरात केळी या फळाचे दर कडाडले आहेत. 


केळी फळ धोक्यात


गोल्बल वार्मिंग तसेच बदलत्या हवामानाचा मोठा फटका केळी या फळाला बसला आहे. केवळ केळी पिकाचे उत्पादनच घटने नाही तर केळी हे पीकच धोक्यात आले आहे. केळी पिकावर मोठ्या प्रमाणात रोगांचा प्रादुर्भावर झाला आहे. केळी हे अतिशय मऊ फळ आहे. यामुळे केळी फळाला बुरशी, फ्युसेरियम विल्ट TR4 या रोगांचा प्राधुर्भाव होत आहे. ऑस्ट्रेलिया, आशिया आणि आफ्रिकेत मोठ्या प्रमाणात केळी पिकाला या रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. दक्षिण अमेरिकेतही केळी पिकावरील हा रोग पसरला आहे.  या रोगामुळे केळी पिकाचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. एकदा या रोगाने केळी पिकाला ग्रासले की पिकाचा बचाव करणे जवळपास अशक्य आहे. या रोगामुळे केळी हे फळच नाही तर ते केळीचं झाडंच उन्मळून पडत आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात केळी पिक नष्ट होत आहे.   


केळी खाण्याचे आरोग्यासाठी जबरदस्त फायदे


केळी खाण्याचे आरोग्यासाठी जबरदस्त फायदे आहेत. केळी हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.  केळ्यामध्ये व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन-बी आणि मॅग्नेशियम आढळतात, याशिवाय व्हिटॅमिन-सी, पोटॅशियम आणि व्हिटॅमिन-बी6 सह अनेक पोषकतत्वे असतात. एक केळी दिवसभर ऊर्जा देते. केळी अनेक गंभीर आजारांपासून संरक्षण करते.