अमर काणे, नागपूर, झी मीडिया : तुम्ही जर आजारी (sick) पडलात तर आजाराचं निदान करण्यासाठी ब्लड सॅम्पल्स (Blood Sample), युरीन सॅम्पल्स घेतले जातात किंवा इतर टेस्ट (Medical Test) केल्या जातात. मात्र येत्या काळात या टेस्टऐवजी तुमच्या आवाजावरूनच (Voice) आजाराचं निदान होऊ शकतं. याबाबत एक मोठं संशोधन (Research) पुढे येतंय. काय आहे हे संशोधन, चला पाहूयात. (revolutionary step in medical field your voice may be tell your disease big research)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुम्ही आजारी पडल्यानंतर डॉक्टरकडे जाता, त्यावेळी रोगाचं अचूक निदान करण्यासाठी डॉक्टर तुम्हाला काही टेस्ट सुचवतात. ब्लड टेस्ट, युरीन टेस्ट, सिटी स्कॅन, एमआरआय अशा टेस्ट आता आपल्या अंगवळणी पडल्या आहेत. पण यात आता आणखी एका टेस्टची भर पडणारंय ती म्हणजे व्हॉईस टेस्ट. या टेस्टमध्ये तुमच्या आवाजावरूनच तुम्हाला कोणता आजार आहे हे समजू शकेल. जगभरातील संशोधकांनी यावर एक डेटाबेस तयार केलाय. 


ज्याप्रमाणे रक्तदाब आणि हृदयाच्या ठोक्यांनुसार आजाराचं निदान करता येतं त्यानुसार आवाजावरही आजार समजू शकतो. रूग्णाला कोणता आजार आहे यावर रूग्णाच्या आवाजाचा पोत कमी जास्त असतो असा दावाही या संशोधनात करण्यात आलाय. या तंत्रज्ञानामुळे अल्झायमरपासून कॅन्सरपर्यंतच्या आजारांचं निदान होऊ शकतं असं संशोधकांचं म्हणणं आहे. 


केवळ मेडिकल इंडस्ट्रीज नाही तर टेक्नॉलॉजी क्षेत्रातील अनेक कंपन्याही आवाजाचा वापर करून नवनवीन गॅझेट्स तयार करतायेत. ऍलेक्सा हे त्याचच उत्तम उदाहरण...आता येत्या काळात ऍलेक्साप्रमाणेच आवाजाचा वापर करून माणसाच्या आजाराचं निदान करता आलं तर आश्चर्य वाटायला नको.