इंटरनेटवर व्हायरल होतोय `हा` फोटो; ज्यूस पिण्याच्या योग्य पद्धतीचे परिणाम पाहिलेत का?
गेल्या काही दिवसांपासून इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर एक फोटो खूप शेअर केला जातोय.
मुंबई : आजच्या काळात सोशल मीडिया हा प्रत्येकाच्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनलाय. अनेकदा सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला अनेक गोष्टींचा उलगडा होतो. अशा परिस्थितीत अनेक वेळा अशी माहिती इंटरनेटवर व्हायरलही होते, ज्यामुळे आपली मजेशीर फसवणूक होऊ शकते.
गेल्या काही दिवसांपासून इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर एक फोटो खूप शेअर केला जातोय. यामध्ये पॅकेज ज्यूस पिण्याची योग्य पद्धत सांगितली गेली आहे. मात्र जेव्हा ही योग्य पद्धत अवलंबली गेली तेव्हा नेमकं काय झालं हे तुम्ही पाहिलंत का?
आम्ही सहसा पॅक ज्यूस स्ट्रॉच्या सहाय्याने पिताना उंच बाजू बॉक्समध्ये टाकून पितो. तर ज्यूस पिण्यासाठी आपण स्ट्रॉचा झुकलेला भाग वापरतो. पण व्हायरल होत असलेल्या पोस्टमध्ये ही पद्धत चुकीची असल्याचं सांगण्यात आलं.
मुळात आपण स्ट्रॉचा तिरपा भाग ज्यूस बॉक्सच्या आत टाकून सरळ बाजूने रस पिण्यासाठी वापरला पाहिजे, असं म्हटलं गेलंय. ही पोस्ट पाहून लोकांना वाटू लागले की आजपर्यंत त्यांनी चुकीच्या पद्धतीने ज्यूस पित होतो. मात्र यानंतर हा व्हिडीओ समोर आला, ज्यात या हॅकचा अवलंब करून ज्यूस पिण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यानंतर संपूर्ण सत्य बाहेर आलं.
पहा कशी झाली फजिती?
फेसबुकवर एका महिलेने हे हॅक पाहून व्हिडिओ बनवला. त्यानुसार तिने ज्यूस पॅकमध्ये स्ट्रॉचा तिरपका भाग टाकला. यानंतर, स्ट्रॉच्या मोठ्या बाजूने ज्यूस पिण्याचा प्रयत्न केला. मात्र हे करत असताना संपूर्ण स्ट्रॉ पॅकेटच्या आतमध्ये गेला. अशा प्रकारे व्हायरल होणाऱ्या हॅकचे सत्य समोर आलंय. त्यामुळे तुम्हीही असा प्रकार करण्याचा प्रयत्न करू नका.