Chess robot : काळाच्या ओघात रोबो माणसाच्या सामान्य जीवनात मिसळत आहेत. पण रशियाच्या मॉस्कोमध्ये घडलेल्या एका घटनेने लोकांमध्ये रोबोट्सबद्दल भीती निर्माण झाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या आठवड्यात रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये बुद्धिबळाचा (Chess) सामना सुरू होता. यादरम्यान एका रोबोटने(Ro सात वर्षांच्या मुलाचे बोट तोडले. एका रशियन वृत्तपत्राने या घटनेची माहिती दिली आहे. 


टास वृत्तसंस्थेशी बोलताना मॉस्को बुद्धिबळ महासंघाचे अध्यक्ष सर्गेई लाजरेव्ह म्हणाले की, 'रोबोटने मुलाचे बोट तोडले. हे खरच वाईट आहे.' सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये रोबोट आणि मुलामध्ये बुद्धिबळाचा सामना पाहायला मिळत आहे.


व्हिडिओमध्ये, रोबोटने सुरुवातीला बुद्धीबळाच्या पटावरील मुलाच्या बाजूची एक सोंगटी उचलली आणि बाहेर ठेवली. यानंतर मुलगा आपली चाल खेळायला गेला पण रोबोटने त्याचे बोट पकडले. 19 जुलै रोजी झालेल्या सामन्यात हा अपघात झाला आहे.


त्यामुळे तेथे उपस्थित लोकांमध्ये एकच खळबळ उडाली. चार माणसे मुलाच्या मदतीसाठी पुढे येतात आणि अखेरीस त्याला रोबोटच्या पकडीतून सोडवतात. लाजरेव्ह म्हणाले की, या मशीनने यापूर्वी अनेक सामने कोणत्याही अपघाताशिवाय खेळले आहेत.



लहान मुलाच्या घाईमुळे हा अपघात झाल्याचे लाजरेव्ह यांनी सांगितले. आम्ही रोबोटला कामावर घेतले होते. बऱ्याच दिवसांपासून तज्ज्ञांसोबत वेगवेगळ्या ठिकाणी त्याचे प्रदर्शन सुरू आहे, असेही ते म्हणाले.



खेळताना रोबोट चालकाने दुर्लक्ष केल्याचे लाजरेव्ह यांनी म्हटले आहे. चाल खेळल्यानंतर रोबोटला प्रतिक्रिया देण्यासाठी वेळ द्यावा लागतो. पण मुलाने घाई केल्याने रोबोटने त्याचे बोट पकडले, असे त्यांनी सांगितले.