Russia detains IS suicide bomber : भारतात भाजपच्या (BJP) एका बड्या नेत्यावर आत्मघातकी हल्ला घडवून हत्येचा कट रचल्याचं उघड झालंय. रशियात आंतरराष्ट्रीय पातळीवरची खतरनाक दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रशियन फेडरल सिक्युरिटी ब्युरोने या दहशतवाद्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. सुसाईड बॉम्बर असलेला हा दहशतवादी देशात भाजपच्या बड्या नेत्याच्या हत्येच्या तयारीत होता. मात्र त्याआधीच रशियात तो पकडला गेलाय. मध्य आशियातल्या देशाचा तो रहिवासी आहे. सुसाईड बॉम्बर म्हणून त्याची तुर्कस्तानात भरती झाली होती.


रशियन न्यूज एजन्सीने दिलेल्या वृत्तानुसार FSB ने रशियामध्ये प्रतिबंधित दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटच्या (ISIS) दहशतवाद्याची ओळख पटवून त्याला तात्काळ अटक केली. हा दहशतवादी मध्य आशियातील रहिवासी असून भारतातील एका मोठ्या नेत्यावर हल्ला करण्याच्या तयारीत होता.


रशियन एजेंसी अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्याची कसून चौकशी करत आहेत. दहशतवादी संघटना ISIS आपली विचारधारा पसरवण्यासाठी इंटरनेट-आधारित सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वापरत आहे. या संदर्भात भारतीय एजन्सी सायबर स्पेसवर लक्ष ठेवून आहेत.