Ukraine Russia War : युक्रेनमध्ये (Ukraine) मृत्यूचं तांडव सुरु आहे. रशियाने (Russia) या देशाला इतक्या खोलवर जखमा दिल्या आहेत की, येणाऱ्या अनेक पिढ्या ते आठवून हादरतील. युक्रेनची राजधानी कीवमध्ये (Kivy) 410 जणांचे मृतदेह सापडले आहेत. यातील अनेकांचे हात बांधलेले होते आणि कपाळावर गोळ्या मारण्यात आल्या होत्या. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

युक्रेनमधील या छायाचित्राने संपूर्ण जग सून्न झालं आहे.  एका अमेरिकन कंपनीने कीवचे काही सॅटेलाइट फोटो जारी केले आहेत. या मृतदेहांना पुरण्यासाठी कीवमधील चर्चमध्ये 45 फूट लांबीचा खड्डा खोदण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.


रशिय सैनिकांच्या छावणीजवळ मिळाले मृतदेह
ज्या ठिकाणी रशियन सैनिकांनी छावण्या बनवल्या होता त्या ठिकाणी बहुतेक मृतदेह सापडले आहेत. यामध्ये अनेकांचे हात बांधले गेले होते, काहींचे पाय तर काहींच्या कपाळावर गोळ्या मारण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी या हत्यांसाठी पूर्णपणे रशियाला जबाबदार धरलं आहे. राष्ट्रपती झेलेन्स्की यांनी हे सर्वात मोठं नरसंहार असल्याचं म्हटलं आहे. 


रशियाने दिला नकार
युक्रेनचे आरोप रशियाने फेटाळले आहेत. रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या मृतदेहांची छायाचित्रे आणि व्हिडिओ युक्रेनने केवळ माध्यमांसाठी उभं केलेलं एक चित्र आहे. बुचा शहर सोडल्यानंतर कोणत्याही हिंसाचार आणि छळाचा उल्लेख नाही. एकाही नागरिकाला रशियन सैन्याच्या कोणत्याही हिंसक कारवाईचा सामना करावा लागला नाही, असं रशियाने म्हटलं आहे.