मुंबई : व्लादिमीर पुतीन (Vladimir Putin) यांनी काही दिवसांपूर्वी युक्रेनमध्ये 'स्पेशल मिलिटरी ऑपरेशन'ची घोषणा केली आणि साऱ्या जगाला हादरा मिळाला. त्या क्षणापासून, किंबहुना त्याहीआधीपासून रशियाच्या राष्ट्राध्यक्षांची संपूर्ण जगात चर्चा सुरु होती. (russia Ukraine conflict)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जगासमोर येणारे व्लादिमीर पुतीन आणि त्यांच्या भूमिकांपेक्षाही सध्या जास्त कुतूहल व्यक्त केलं जात आहे ते म्हणजे त्यांच्या कुटुंबाबद्दल. 


कारण, फार क्वचित प्रसंगीच त्यांचं कुटुंबीय आजवर जगासमोर आलं आहे. पुतीन यांना दोन मुली आहेत. त्यांची एक मुलगी मारिया ही वैद्यकिय संशोधक आहे. मॉस्कोमध्ये ती डच पती जॉरिट फासेन याच्यासोबत राहते. 



त्यांची दुसरी मुलही कतरिना ही अॅक्रोबॅट डान्सर असून, ती मॉस्को स्टेट युनिवर्सिटीमध्ये उच्च पदावर कार्यरत आहे. रशियातील धनाध्य किली शॅमलॉव याच्याशी तिचं लग्नं झालं होतं. पण, त्यांच्या नात्यात घटस्फोटाची ठिणगी पडली. 



असं म्हटलं जातं की एका सफाई कर्मचारी महिलेशी त्यांचे संबंध होते. 2020 मध्ये ही बाब जगासमोर आली. आज तिच महिला अरबोंच्या संपत्तीची मालकीण आहे. 


स्वेतलाना क्रिवोनोगिख (Svetlana Krivonogikh) असं तिचं नाव असून, 90 च्या दशकापासून त्यांच्यातं हे नातं होतं. 



पुतीन आणि स्वेतलाना क्रिवोनोगिख (Svetlana Krivonogikh) यांना एक मुलगी आहे असा खुलासा मागच्या वर्षी झाला. येलिजावेटा व्लादिमीरोवना उर्फ लुईजा (Luiza) असं तिचं नाव. तिच्या जन्मानंतर या नात्यात दुरावा आला. 



आपल्या या लेकिवर पुतीन बराच खर्च करतात. सोशल मीडियावर तिची जीवनशैली पाहून याचा सहज अंदाज लावता येतो. 



सूत्रांच्या माहितीनुसार 37 वर्षीय जिम्नॅस्ट एलिना काबायेवा (Alina Kabaeva) हित्याशीही पुतीन यांचं नातं आहे. एलिनानं ऑलिम्पिक खेळांमध्ये सुवर्णपदक मिळवलं आहे. ती राजकारणात सक्रीय असून, पुतीन यांच्या पक्षातही समाविष्ट आहे. 



1983 मध्ये पुतीन यांनी ल्‍यूडमिला शक्‍रेबनेवा (Lyudmila Shkrebneva) यांच्याशी लग्न केलं होतं. हीच मारिया आणि कतरिनाची आई. 2013 मध्ये त्यांच्या नात्याला तडा गेला. 



व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांच्या संपत्तीचा एकूण आकडा 16555 अब्ज रुपये इतका आहे. जगासमोर आलेला हा आकडा जितका थक्क करणारा आहे तितकाच पुतीन यांचा खासगी आयुष्याचा प्रवासही.